IND Vs WI 3rd T20 Live Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज तिसरा टी20 सामना होत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संगाला पराभवाचा सामना करावा लागला होता. फलंदाजीमुळे भारतीय संघाला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात विडिंजने 4 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या टी20 सामन्यात दोन विकेटने विडिंजने बाजी मारली होती. आता तिसरा सामना जिंकून मालिकेत बाजी मारण्याचा विडिंजचा प्रयत्न असेल तर हा सामना जिंकून कमबॅक करण्याचा हार्दिक आणि संघाचा विचार असेल. तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. सलामी जोडी बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय अक्षर पटेल, रवि बिश्नोई आणि मुकेश कुमार यांनाही वगळण्यात येण्याची शक्यता आहे. 


यशस्वी जायसवाल करु शकतो पदार्पण -  


तिसऱ्या टी20 सामन्यात युवा  यशस्वी जायसवाल पदार्पण करण्याची शक्यता आहे. यशस्वी जायस्वाल याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत सर्वांनाच प्रभावित केले होते. त्यानंतर कसोटीमध्येही त्याने संधीचे सोनं केले होते. त्यामुळे आता टी 20 मध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. ईशान किशन आणि यशस्वी जयस्वाल सलामीला उतरु शकतात. तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल खेळण्याची शक्यता आहे. 


टीम इंडियात अनेक बदल होण्याची शक्यता - 


दोन्ही सामन्यात पराभव झाल्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.  मुकेश कुमार याच्या जागी आवेश खान अथवा उमरान मलिक यांना संधी मिळू शकते.  रवि बिश्नोई याच्या जागी कुलदीप यादवचे पुनरागमन होईल. 


हार्दिक आणि अर्शदीप यांनी दुसऱ्या सामन्यात भेदक मारा केला होता. दोघांचाही चेंडू स्विंग होत होता. दोन महिन्यानंतर मैदानात उतरलेला चहलही प्रभावी वाटत होता. पण रवि बिश्नोई आणि मुकेश कुमार यांनी प्रभावी कामगिरी केली नाही. त्यामुळे या दोघांची सुट्टी होऊ शकते.  


टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 आंतरराष्ट्रीय हेड टू हेड 


टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 27 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियानं 17 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं केवळ 9 सामने जिंकले आहेत. याव्यतिरिक्त एक सामना अनिर्णित राहिला आहे. 









पहिल्या दोन्ही सामन्यात फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना केलाय. पहिल्या सामन्यात टीम इंडिया फक्त 145 धावांपर्यंत मजल मारु शकला. हा सामना विडिंजचे 4 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया 152 धावांपर्यंत मजल मारु शकला. हा सामना विडिंजने दोन विकेटने जिंकला. अशा स्थितीत तिसऱ्या वनडे सामन्यात प्लेईंग 11 मध्ये बदलाची शक्यता आहे.