India vs West Indies Live : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली असून दोन्ही संघानी एक-एक सामना जिंकल्यामुळे मालिका सध्या बरोबरीत आहे. ज्यामुळे आजचा सामना जिकंणारा संघ मालिकेत आघाडी घेऊ शकतो. मालिकेतील पहिला सामना भारताने तब्बल 68 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. ज्यानंतर दुसरा सामना वेस्ट इंडीजने 5 विकेट्सनी जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. दरम्यान आज तिसरा सामना पार पडत असून हा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...


कधी आहे सामना?


आज 2 ऑगस्ट रोजी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरा टी20 सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरु होईल. 9 वाजता  नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना सेंट किट्स येथील वॉर्नर पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील हा सामना डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहता येणार आहे. फॅन कोड या अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.   


वेस्ट इंडीजविरुद्ध T20 मालिकेसाठी भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवींद्रचंद्र अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.  


हे देखील वाचा-