IND vs WI 3rd T20: तिसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात 159 धावांपर्यंत मजल मारली. ब्रेंडन किंग आणि कर्णधार रोवमन पॉवेल यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. किंग याने दमदार सुरुवात दिली तर पॉवेल यांनी जोरदार फिनिशिंग केली. किंग याने 42 तर पॉवेल याने 40 धावांची खेळी केली. भारताकडून कुलदीप यादव याने तीन विकेट घेतल्या. भारताला विजयासाठी 160 धावांचे आव्हान मिळालेय. 



वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमन पॉवेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्मय घेतला. सलामी फलंदाज ब्रँडन किंग आणि काइल मेयर्स यांनी वेस्ट इंडिजला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनीही वेगाने धावसंख्या जमवल्या. पावरप्लेमध्ये सहा षटकात त्यांनी 38 धावा जमवल्या होत्या. ब्रँडन किंग आणि काइल मेयर्स यांनी पहिल्या विकेटसाठी  7.4 षटकात 55 धावांची भागिदारी केली. अक्षर पटेल याने काइल मेयर्स याला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. काइल मेयर्स याने 20 चेंडूत 25 धावांची खेळी केली. त्यानंतर जोनसन चार्ल्स आणि किंग यांनी विडिंजचा डाव सावरला. दोघांमध्ये चांगली भागिदारी होत होती. त्याचवेळी कुलदीप यादव याने विडिंजचा एकापाठोपाठ एक धक्के दिले. कुलदीप यादव याने लागोपाठ दिल फलंदाजांना तंबूत पाठवले. कुलदीप यादव याने चार्ल्स याला 12 धावांवर बाद केले. त्यानंतर धोकादायक निकोलस पूरन याला 20 धावांवर बाद केले. एक बाजू लावून धरणाऱ्या ब्रेंडन किंग याला 42 धावांवर कुलदीपने बाद केले. लागोपाठ विकेट पडल्यामुळे विडिंजच्या धावसंख्येला खिळ बसली. 


किंग याने 42 चेंडूत एक षटकार आणि पाच चौकाराच्या मदतीने 42 धावांची खेळी केली. चार्ल्स याने 14 चेंडूत एक षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 12 धावांचे योगदान दिले. निकोलस पूरन याने दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 12 चेंडूत 20 धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात मुकेश कुमार याने हेटमायर याला तंबूत धाडले. हेटमायर याने 8 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 9 धावांची खेळी केली. 


कर्णधार रोवमन पॉवेल याने अखेरच्या काही षटकात विस्फोटक फलंदाजी करत विडिंजची धावसंख्या 150 पार पोहचवली.  रोवमन पॉवेल याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. पॉवेल याने फिनिशिंग टच दिला. पॉवेल याने अवघ्या 19 चेंडूत 40 धावांची वादळी खेळी केली. पॉवेल याने या खेळीत तीन षटकार आणि एक चौकार लगावला.


भारताकडून कुलदीप यादव याने भेदक मारा केला. कुलदीप यादव याने 4 षटकात 28 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या, अर्शदीप आणि युजवेंद्र चहल यांना विकेट मिळाली नाही. अक्षर पटेल याने 4 षटकात 24 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. तर मुकेश कुमार याने दोन षटकात 19 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली.