IND vs WI 2nd T20: कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तसेच दुसऱ्या टी-10 सामन्यात वेस्ट इंडीजला पराभूत करून भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्यासाठी सज्ज झालाय. तर, आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ मैदानात उतरणार आहे. परंतु, दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी वेस्ट इंडीजच्या संघाची धाक- धूक वाढवणारी माहिती समोर आलीय. पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सलामीवीर ईशान किशनची कामगिरी निराशाजनक होती. यामुळं दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याच्याऐवजी ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता आहे. ऋतुराज गायकवाड गेल्या काही महिन्यांपासून मैदानात धावांचा पाऊस पाडत आहे. त्याचं संघात सामील होणं वेस्ट इंडीजसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.


वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा ऋतुराज गायकवाडसह डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. आयपीएलच्य मागच्या हंगामात ऋतुराज गायकवाडनं स्वबळावर चेन्नईच्या संघाला विजेतेपद जिंकून दिलंय. त्याच्या फलंदाजीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. पहिल्या सामन्यात रोहित शर्मा एकिकडे धावा काढत होता. पण ईशान किशनला धावा काढणं कठीण जात होतं. त्यानं केलेल्या फलंदाजीमुळं नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं होतं. यामुळं दुसऱ्या टी-20 सामन्यात ईशान किशनला विश्रांती दिली जाऊ शकते. 


चेन्नईला आयपीएलचं खिताब जिंकवलं
ऋतुराज गायकवाडनं आयपीएलच्या मागच्या हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यानं स्वबळावर चेन्नईच्या संघाला चॅम्पियन बनवलं आहे. त्यानं आयपीएलच्या मागच्या हंगामात चेन्नईच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. ज्यामुळं देशभर त्याची चर्चा होती. चेन्नईकडून खेळताना त्यानं 16 सामन्यात 636 धावा केल्य आहेत. त्याच्या सर्वोकृष्ट खेळीमुळं चेन्नईच्या संघानं त्याला रिटेन केलं होतं. 


देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन
ऋतुराज गायकवाडनं आपल्या खेळीनं सर्वांची मनं जिंकली आहेत. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकल्यानंतर त्यानं विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग चार शतके झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. सुरुवातीला संयमी फलंदाजी करायची आणि गेम पुढे चालवायची. त्यानंतर आक्रमक फलंदाजी करायची, अशी ऋतुराज गायकवाडची शैली बनली आहे. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha