IND vs WI 2nd T20I: भारत आणि वेस्ट इंडीज(IND vs WI) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात (2nd T20) वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली आहे. आजच्या सामन्यातील मैदानाची स्थिती पाहता प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णयच योग्य असल्याचं तज्ज्ञांचं म्हणंण होतं. पोलार्डने त्यानुसार प्रथम गोलंदाजी घेतली आहे. 


एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकत भारताने वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिला. त्यानंतर आता तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने पहिला सामना जिंकला आहे. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात भारत विजय मिळवून मालिका विजयासाठी प्रयत्न करेल. तर वेस्ट इंडीजचा संघ बरोबरीसाठी जीवाचं रान करेल. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पार पडणारा हा दुसरा टी20 सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन (Eden Garden) मैदानावर खेळवला जात आहे.  


दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ (India’s T20I squad) 


रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल


दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी वेस्ट इंडीज संघ (WI T20I squad) 


ब्रँडन किंग, काईल मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकिपर), रोवमॅन पोवेल, कायरन पोलार्ड (कर्णधार), रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, अकेल होसेन, ओडेन स्मिथ, जेसन होल्डर, शेल्डॉन कॉट्रेल


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha