Most 'Bowled' wickets for India in Test history : आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या अश्विन याने वेस्ट इंडिजविरोधात भेदक मारा केला. अश्विनने विंडिजच्या दोन्ही सलामी फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. वेस्ट इंडिजचा कर्णधार ब्रेथवेट आणि युवा चंद्रपॉल यांना अश्विनने तंबूचा रस्ता दाखवला. चंद्रपॉल याला बाद करत अश्विन याने दोन विक्रमाला गवसणी घातली आहे. अश्विनने टी चंद्रपॉल याला अवघ्या 12 धावांवर क्लिनबोल्ड केले. चंद्रपॉलला अश्विनचा चेंडू समजलाच नाही, दांड्या उडाल्या... चंद्रपॉल याला क्लिनबोल्ड करताच कसोटीत अश्विनच्या नावावर मोठा विक्रम झालाय. 


चंद्रपॉल याला त्रिफाळाचीत करत कसोटीमध्ये सर्वाधिक क्लिनबोल्ड करण्याचा विक्रम अश्विनच्या नावावर जमा झाला आहे.  अश्विनने कसोटीमध्ये आतापर्यंत 95 फलंदाजांना क्लिनबोल्ड केलेय. भारताकडून सर्वाधिकवेळा क्लिनबोल्ड करण्याचा विक्रम आता अश्विनच्या नावावर जमा झालाय. याआधी हा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता. कसोटीत कुंबळेने 94 फलंदाजांना क्लिनबोल्ड केलेय.. त्याचा हा विक्रम आता अश्विनने मोडला आहे. कपिल देव यांनी 88 तर मोहम्मद शमी याने 68 फलंदाजांना क्लिनबोल्ड केलेय. 






बाप-लेकाला बाद करण्याचा विक्रम - 


चंद्रपॉल याला बाद करत अश्विन याने अनोखा विक्रम नावावर केला आहे. बाप आणि मुलाला बाद करण्याचा विक्रम अश्विनने आपल्या नावावर केला आहे. बाप आणि मुलाला बाद करणारा अश्विन भारताचा पहिला गोलंदाज ठरलाय. अश्विन याने 2011 मध्ये  तेजनारायण चंद्रपॉल याचे वडील  शिवनारायण चंद्रपॉल याला बाद केले होते. आज 12 वर्षानंतर  तेजनारायण चंद्रपॉल याला अश्विन याने तंबूचा रस्ता दाखवला. 2011 मध्ये अश्विनचे कसोटीमध्ये वेस्ट इंडिजविरोधात पदार्पण झाले होते. वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळी शिवनारायण चंद्रपॉल लयीत होता. कसोटीच्या दुसऱ्या डावात अश्विनने शिवनारायण चंद्रपॉल याला 47 धावांवर lbw बाद केले होते. आता मुलगा तेजनारायण चंद्रपॉल याला अश्विन याने तंबूत धाडलेय. बाप आणि मुलाला बाद करणारा अश्विन पहिला गोलंदाज ठरलाय. 


एक विकेट घेताच होणार आणखी एक विक्रम - 


वेस्ट इंडिजचा कर्णधार ब्रेथवेट याला बाद करत अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 699 विकेट पूर्ण केल्या आहेत. अश्विनने आणखी एक विकेट घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अश्विनच्या नावावर 700 विकेट आणि 4 हजार पेक्षा जास्त धावा जमा होतील, अन् असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय खेळाडू होईल.


आणखी वाचा :


IND vs WI : अश्विनच्या नावावर अनोखा विक्रम, 12 वर्षांत बाप अन् लेकालाही केले बाद