Ravi Ashwin Test Record : डोमिनिका कसोटीमध्ये प्रथम गोलंदाजी करताना आर. अश्विन याने भेदक मारा केला. अश्विन याने वेस्ट इंडिजच्या दोन्ही सलामी फलंदाजांना तंबूत पाठवले. यामध्ये वेस्टइंडीजचा सलामी फलंदाज तेजनारायण चंद्रपॉल याचाही समावेश आहे. अश्विनने टी चंद्रपॉल याला क्लिन बोल्ड केले. टी चंद्रपॉल याला फक्त 12 धावांचे योगदान देता आले. चंद्रपॉल याला बाद करत अश्विन याने अनोखा विक्रम नावावर केला आहे. बाप आणि मुलाला बाद करण्याचा विक्रम अश्विनने आपल्या नावावर केला आहे. बाप आणि मुलाला बाद करणारा अश्विन भारताचा पहिला गोलंदाज ठरलाय. अश्विन याने 2011 मध्ये तेजनारायण चंद्रपॉल याचे वडील शिवनारायण चंद्रपॉल याला बाद केले होते. आज 12 वर्षानंतर तेजनारायण चंद्रपॉल याला अश्विन याने तंबूचा रस्ता दाखवला.
कसोटीमध्ये बाप आणि मुलाला बाद करणारा अश्विन पहिला भारतीय गोलंदाज ठरलाय. याआधी कोणत्याही भारतीय गोलंदाजाला असा पराक्रम करता आला नाही. तेजनारायण चंद्रपॉलचे वडील शिवनारायण चंद्रपॉल वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज राहिला आहे. शिवनारायण चंद्रपॉल याने टेस्ट, वनडे आणि टी20 मध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले आहे. शिवनारायण चंद्रपॉल याने वेस्टइंडीजसाठी 164 कसोटी सामने, 268 वनडे आणि 22 टी20 सामने खेळले आहेत. 2011 मध्ये अश्विनचे कसोटीमध्ये वेस्ट इंडिजविरोधात पदार्पण झाले होते. वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळी शिवनारायण चंद्रपॉल लयीत होता. कसोटीच्या दुसऱ्या डावात अश्विनने शिवनारायण चंद्रपॉल याला 47 धावांवर lbw बाद केले होते. आता मुलगा तेजनारायण चंद्रपॉल याला अश्विन याने तंबूत धाडलेय. बाप आणि मुलाला बाद करणारा अश्विन पहिला गोलंदाज ठरलाय.
विराट कोहलीच्या नावावरही विक्रम -
2010-11 मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी युवा विराट कोहलीला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले होते. विराट कोहली त्यावेळी शिवनारायण चंद्रपॉल याच्याविरोधात खेळला होता. त्यानंतर आता तेजनारायण चंद्रपॉल याच्याविरोधात खेळला आहे. अश्विन, विराट आणि सचिन तेंडुलकर बाप लेकाच्या जोडीविरोधात खेळले आहेत. अश्विन आणि विराट चंद्रपॉल बाप-मुलाविरोधात खेळले आहेत. तर सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियाच्या मार्श पिता-पुत्राविरोधात खेळला आहे.