IND vs WI, 1 Innings Highlight: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली, त्यामुळे वेस्ट इंडीज संघाकडे प्रथम फलंदाजी आली. भारतीय गोलंदाजांनी यावेळी कसून गोलंदाजी केली. सुरुवातीचे विकेट पटापट गेले पण निकोलस पूरनने एकहाती खिंड लढवत अप्रतिम अर्धशतक ठोकत 61 धावा केल्या. ज्यामुळे विडींजची धावसंख्या दीडशे पार पोहोचली आहे. ज्यामुळे भारतासमोर आता 158 धावांचे लक्ष आहे. सलामीचा सामना खेळणाऱ्या युवा फिरकीपटू रवी बिश्नोईने देखील दोन विकेट घेत उत्तम गोलंदाजी केली.

सामन्यात भारताने नाणेफेक जिंकल्यानंतरही प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीजला कमी धावांमध्ये बाद करुन नंतर लवकरात लवकर लक्षापर्यंत पोहोचत सामना जिंकण्याची भारताची रणनीती होती. त्यानुसार पहिल्या षटकात भारताने विकेट घेत उत्तम सुरुवात केली. विडींजचे बहुतेक फलंदाज भारतीय गोलंदाजांच्या जाळ्यात अडकले. पण निकोलस पूरनने एकहाती झुंज देत 43 चेंडूत 61 धावा ठोकल्या. मेयर्स आणि कर्णधार पोलार्ड यांनीही अनुक्रमे 31 आणि 24 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ज्यामुळे वेस्ट इंडीजने भारतासमोर 158 धावांचे लक्ष ठेवले आहे. 

बिश्नोई-हर्षलचे दोन-दोन विकेट्स

भारताकडून सलामीचा सामना खेळणाऱ्या रवी बिश्नोईने सर्वोत्तम गोलंदाजी करत 4 ओव्हरमध्ये 17 धावा देत 2 महत्त्वाचे विकेट्स घेतले. त्याच्यासोबत हर्षलने 2 तर चहल, चाहर आणि भुवनेश्वर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेत विंडीजला रोखण्याचा प्रयत्न केला. अखेर 20 षटकं संपताना विडींजने 157 धावा केल्या.

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha