IND Vs WI 1st ODI Live Updates : कसोटी मालिकेनंतर आजपासून वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. बारबाडोस येथे होत असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आहे. रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून यजमान वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेय. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करणार आहे. भारतीय संघ चार वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरणार आहे. मुकेश कुमार याचे वनडेमध्येही पदार्पण झालेय. मोहम्मद सिराजच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजांकडे अनुभव दिसत नाही.
मुकेश कुमारचे पदार्पण -
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने मुकेश कुमार प्लेईंग 11 मध्ये असल्याचे सांगितले. कसोटीमध्ये मुकेश कुमार याने दमदार गोलंदाजी केली होती. त्यानंतर आता वनडेमध्येही मुकेश कुमार याला संधी दिली आहे. मुकेश कुमार याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असेल.
विकेटकीपर कोण ?
भारतीय संघ संजू सॅमसनसोबत जाणार की ईशान किशनला संधी देणार ? याबाबतची चर्चा सुरु होती. रोहित शर्माने याचे उत्तर दिलेय. संजू सॅमसनच्या जागी ईशान किशन याला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले आहे. ईशान किशन चौथ्या क्रमांकावर खेळणार आहे. संजू सॅमसन याला आणखी वाट पाहावी लागणार आहे.
चहल बाहेर -
भारतीय संघ सहा गोलंदाजासह मैदानात उतरला आहे. यामध्ये चार वेगवान गोलंदाज आहेत. दोन फिरकी गोलंदाजांना प्लेईंग 11 मध्ये खेलवण्यात आले आहे. रविंद्र जाडेजा याचे स्थान निश्चित होते. दुसरा फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादव याला संधी देण्यात आली आहे. चहल याला बेंचवरच बसावे लागणार आहे.
वेगवान मारा कसा?
भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरला आहे. यामध्ये हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांना स्थान दिले आहे. त्याशिवाय उमरान मलिक आणि मुकेश कुमार दोन फिरकी गोलंदाज असतील.
भारताची प्लेईंग 11 -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मुकेश कुमार
वेस्ट इंडिजच्या संघात कोण कोण ?
शाय होप (विकेटकीपर/कर्णधार), काइल मायर्स, ब्रँडन किंग, एलिक एथनाज, शिमरोन हेटमायर, रोवमन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, यानिक कारिया, डोमिनिक ड्रेक्स, जेडन सील्स, गुडाकेश मोटी