IND vs WI 1st ODI: रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीच्या जाळ्यात वेस्ट इंडिजचा संघ अडकला. 114 धावांत वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ गारद झाला. वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाय होप याने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. होपचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. कुलदीप यादव याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजचा संघ 23 षटकात 114 धावांपर्यंत मजल मारु शकला. विंडिजचा संघ 50 षटके फलंदाजी करु शकला नाही. भारताला विजयासाठी 115 धावांचे आव्हान मिळाले आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान विडिंज संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांच्या भेदक माऱ्यापुढे वेस्ट इंडिज संघाला 50 षटकेही फलंदाजी करता आली नाही. विडिंजने 23 षटकात 114 धावांपर्यंत मजल मारली. वेस्ट इंडिजकडून शाय होप याने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. त्याशिवाय एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. वेस्ट इंडिजचे सात फलंदाज दुहेरी धावसंख्या पार करु शकले नाहीत.
शाय होप 43, काइल मायर्स 2, ब्रँडन किंग 17, एलिक एथनाज 22, शिमरोन हेटमायर 11, रोवमन पॉवेल4, रोमारियो शेफर्ड 0, यानिक कारिया 3, डोमिनिक ड्रेक्स 3, जेडन सील्स 0 आणि गुडाकेश मोटी 0 धावा करु शकले. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. शाय होप आणि हेटमायर यांनी संयमी सुरुवात करत विडिंजची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 43 धावांची भागिदारी केली. ब्रँडन किंग आणि एलिक एथनाज यांनी दुसऱ्या विकेटसाठी 38 धावा जोडल्या. या दोन भागिदारी वगळता विडिंजकडून एकही भागिदारी दुहेरी धावसंख्या पार करु शकली नाही.
भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच भेदक मारा केली. अनुभवी गोलंदाज नसतानाही भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. नवख्या भारतीय गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचा संघ ढेपाळला. कुलदीप यादव याने सर्वाधिक विकेट घेतल्या. कुलदीप यादव याने 3 षटकात 4 विकेट घेतल्या.. यामध्ये दोन षटके निर्धाव फेकली. रविंद्र जाडेजा याने 6 षठकात 37 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय हार्दिक पांड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. उमरान मलिक याला विकेट घेण्यात अपयश आले.