India vs Western Australia XI, 2nd Match: आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी भारत आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे दुसरा सराव सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफक जिंकून टीम इंडियानं वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. दरम्यान, भारताचा फिरकीपटू आर. अश्विन (Ravichandran Ashwin) आणि हर्षल पटेलच्या (Harshal Patel) भेदक गोलंदाजीसमोर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा संघ डगमगताना दिसला. या सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियानं 20 षटकात 8 विकेट्स गमावून 162 धावापर्यंत मजल मारू शकला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी निक होबसननं (Nick Hobson) 63 आणि डी अर्सी शॉर्टनं (D Arcy Short) 52 धावांचं योगदान दिलं.


प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या वेस्टर्न ऑस्ट्रेलयाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर अर्शदीप सिंहनं जोश फिलिपच्या रुपात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. मात्र, त्यानंतर डी आर्सी शॉर्ट आणि निक हॉबसन संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. दोघांमध्ये 115 धावांची भागेदारी झाली. दरम्यान, चौदाव्या षटकात हर्षल पटेलनं दोन विकेट्स घेऊन वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं. हर्षल पटेलनं या षटकातील तिसऱ्या चेंडूवर निक होबसनला आऊट केलं. याच षटकातील अखेरच्या चेंडूवर डी अर्सी शॉर्टलाही पव्हेलियनचा रस्ता दाखवला गेला. त्यानंतर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला काही खास कामगिरी करता आली नाही. वेस्टर्न ऑस्ट्रेलियानं 20 षटकात 8 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. भारताकडून आर.अश्विननं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, हर्षल पटेलला दोन विकेट्स मिळवता आल्या. याशिवाय, युवा गोलंदाज अर्शदीपच्या खात्यातही एख विकेट्स जमा झाली. 


ट्वीट-






 


संघ-


भारताची प्लेईंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, दीपक हुडा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग


वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन
जोश फिलिप (विकेटकिपर), डी आर्सी शॉर्ट, निक हॉबसन, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, अॅश्टन टर्नर (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, सॅम फॅनिंग, मॅथ्यू केली, हॅमिश मॅकेन्झी, डेव्हिड मूडी, अँड्र्यू टाय, लान्स मॉरिस


हे देखील वाचा-