AUS vs ENG 1st T20: तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाच्याच्या (England Tour Of Australia) दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात इंग्लंडनं ऑस्ट्रेलिया पराभव करत मालिकेवर कब्जा केलाय. इंग्लंडनं प्रथमच ऑस्ट्रेलियात टी-20 मालिका जिंकलीय. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं (Jos Buttler) ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज केन रिचर्डसनच्या (Kane Richardson) गोलंदाजीवर मारलेल्या षटकारानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. जोस बटलरच्या आगळ्यावेगळ्या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 9 ऑक्टोबर रोजी पहिला टी-20 सामना खेळला गेला. हा सामना इंग्लंडनं आठ धावांनी जिंकला. दरम्यान, इंग्लंडच्या डावातील पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाचा केन रिचर्डसन गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर जोस बटलरनं षटकार ठोकला, जो पाहून स्वतः गोलंदाज रिचर्डसन आश्चर्यचकित झाला. या सामन्यात जोस बटलरनं 32 चेंडूत 68 धावांची तुफानी खेळी केली.
व्हिडिओ-
इंग्लंडचा मालिकेवर कब्जा
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-20 सामना बुधवारी (12 ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यात इंग्लंडनं 8 धावांनी विजय मिळवला. तर, 49 चेंडूत 82 धावांची वादळी खेळी करणाऱ्या इंग्लंडचा फलंदाज डेविड मलाननं सामनावीराचा पुरस्कार जिंकला. विशेष म्हणजे, पहिला टी20 सामनाही इंग्लंडने 8 धावांनी जिंकला होता. आता या मालिकेत इंग्लंड 2-0 ने आघाडीवर आहे. उभय संघातील तिसरा आणि शेवटचा टी20 सामना 14 ऑक्टोबर रोजी कॅनबेरा स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी टी-20 मालिका दोन्ही संघासाठी महत्वाची होती. या मालिकेद्वारे दोन्ही संघाला आपपल्या उत्कृष्ट खेळाडूंची पारख करण्याची संधी मिळणार होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी-20 सामना जिंकून इंग्लंडच्या संघानं इतिहास रचला. इंग्लंडनं पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात टी-20 सामना जिंकलाय.
हे देखील वाचा-