कोलंबो : भारतीय क्रिकेट संघ (Team India) तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी श्रीलंकेत (Sri Lanka) दाखल झाला आहे. श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्त्वात टी 20 मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट संघ काल कोलंबोत दाखल झाला आहे. आजपासून भारतीय संघानं गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात सराव सुरु केला आहे. गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) कार्यकाळ देखील या मालिकेपासून सुरु होणार आहे. सूर्यकुमार यादवची टीम इंडियाच्या टी 20 संघाचा पूर्णवेळ कॅप्टन म्हणून आणि गौतम गंभीर याचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ या मालिकेपासून सुरु होणार आहे. 


गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात पहिल्या मालिका विजयासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. काल श्रीलंकेत दाखल झालेल्या भारतीय संघानं आजपासून सराव सुरु केला आहे. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग यांच्यासह सर्व खेळाडू सराव सत्रात सहभागी झाले होते. 


हार्दिक पांड्या पु्न्हा टीम इंडियाच्या जर्सीत


हार्दिक पांड्यानं भारताला टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हार्दिक पांड्यासाठी गेले काही दिवस आव्हानात्मक होते. भारताच्या टी 20 संघाच्या कर्णधारपदासाठी नाव चर्चेत असताना ती जबाबदारी सूर्यकुमार यादवला दिली गेली. उपकर्णधारपद देखील शुभमन गिलकडे सोपवण्यात आलं.याशिवाय हार्दिकनं गेल्या आठवड्यात नताशा स्टॅनकोविक आणि तो वेगळं होत असल्याची घोषणा केली होती.   


भारताला टी 20 वर्ल्ड कप जिंकवून देण्यात हार्दिक पांड्यानं महत्त्वाची कामगिरी बजावली होती. भारतानं झिम्बॉब्वे विरूद्धच्या मालिकेत शुभमन गिलच्या नेतृत्त्वात यंग ब्रिगेडनं 4-1 असा विजय मिळवला होता. त्यावेळी वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला होता. आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची मालिका पालेकलमध्ये खेळवली जाणार आहे. 27 जुलै,28 जुलै आणि 30 जुलै रोजी  तीन मॅच होणार आहेत. 


दरम्यान, या मालिकेनंतर 2 जूनपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. एकदिवसीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. विराट कोहली देखील या मालिकेत खेळणार आहे.   
   


टी20 मालिकेसाठी टीम इंडिया - 


सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज


वनडे मालिकेसाटी टीम इंडिया 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर)ऋषभ पंत (विकेटकीपर),श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा






संबंधित बातम्या :


कॅप्टन सूर्याला हार्दिककडून अनोख्या शुभेच्छा, रिषभ पंतसमोर पांड्यानं एका कृतीनं मनं जिंकली

 

श्रीलंका दौऱ्याआधी भारताच्या अष्टपैलू खेळाडूने उरकला साखरपुडा; फोटो आले समोर