भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन दिवसीय टी-20 झाली. या मालिकेत भारताने श्रीलंकेवर 3-0 ने दमदार विजय मिळवला. या सामन्यात सुपवर ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादवने आपल्या नेतृत्त्वाची चुणूक दाखवून दिली. खुळाडूंच्या क्षमता जोखण्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्यात अनेक नवे प्रयोग केले. याच सामन्यात सूर्याने भारताचा नव्या दमाचा आघाडीचा फलंदाज रिंकू सिंहला गोलंदाजी करायला सांगितली. विशेष म्हणजे हातात चेंडू आल्यानंतर रिंकू सिंहनेही स्वत:ला सिद्ध केलं. रिंकू सिंहच्या गोलंदाजीदरम्यान भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची एक रिअॅक्शन चांगलीच चर्चेचा विषय ठरतेय. त्याने दिलेली रिअॅक्शन सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. 


सामन्यात नेमकं काय घडलं?


भारत-श्रीलंका यांच्यातील तिसरा सामना शेवटच्या टप्प्यात होता. शेवटची दोन षटके राहिली होती. सामना चांगलाच रंगात आला होता. 19 व्या षटकादरम्यान सूर्यकुमार यादवने मोठा आणि आगळावेगळा निर्णय घेतला. सामना जिंकण्याचा दबाव असताना त्याने रिंकू सिंहच्या हातात चेंडू दिला. विशेष म्हणजे रिंकू सिंहनेही या विश्वासाला सार्थ ठरवत 19 व्या षटकात अवघ्या तीन धावा देत दोन गडी बाद केले.  त्याची हीच कामगिरी पाहून गौतम गंभीर अचंबित झाला. 


कॅमेऱ्यात कैद झालेला तो क्षण पाहा :









गौतम गंभीरची अॅक्शन कॅमेऱ्यात कैद 


रिंकू सिंगने 19 व्या षटकात एकूण दोन गडी बाद केले. त्याने मैदानावर जम बसवलेल्या कुशल परेराला 43 धावांवर तंबूत पाठवलं. तसेच रमेश मेंडिसला (1 धाव) त्याने झेलबाद केले. या दोन्ही खेळाडूंचे बळी गेल्यानंतर गौतम गंभीरच्या चेहऱ्यावरील आनंद लपून राहिला नाही. रिंकूने पहिल्यांदा कुशल परेराला बाद केल्यावर गौतम गंभीरला हसू आले. त्याने आनंदाने मंडावर हात मारला. तर रिंकूने रमेश मेंडिसच्या रुपात दुसरा बळी घेतल्यावरही गौतम गंभीरला आनंद झाला. तो रिंकू सिंगची प्रशंसा करत होता. हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला. 


हेही वाचा :


ना रोहित, ना विराट, ना बुमराह, तरीही 3-0 ने मालिका जिंकली, गंभीर-सूर्याच्या जोडीने कमाल केली!


Ind vs SL T20: श्रीलंकेला 6 चेंडूत 6 धावांची गरज...मेन गोलंदाज नव्हे सूर्या आला अन् श्रीलंकेला केले चीतपट, पाहा Video


Ind vs SL: गौतम गंभीरचा मेसेज, सूर्यकुमार यादवची हालचाल; रिंकू सिंहच्या हातात चेंडू अन् तो एक क्षण!