Ind vs SL Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि नवीन टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांची सुरुवात चांगली झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाने श्रीलंकेच्या 3-0 अशा फरकाने पराभूत केला होता. आजपासून टीम इंडिया रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादवला विश्रांती देण्यात आली असून टी-20 च्या मालिकेनंतर तो मायदेशी परतला आहे. एकदिवसीय मालिकेआधी सूर्यकुमार यादवने एक अनोखी इच्छा व्यक्त केली आहे. याबाबतचा व्हिडीओ देखील बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
भारताच्या टी-20 मालिका विजयानंतर बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादव कर्णधार रोहित शर्माबाबत म्हणाला की, All the best for ODI, मी संपूर्ण मालिका पाहीन आणि तुझ्या वन-लाइनर्सची वाट पाहीन. मला माहिती आहे तु स्टंप माइकचा चाहता आहे. त्यामुळे तु त्याच्या जवळच उभा राहशील. संघात बरेच नवीन खेळाडू आहेत. त्यामुळे आम्हाला आणखी बरेच वन-लाइनर्स ऐकायला मिळतील, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
बीसीसीआयने शेअर केलेला संपूर्ण व्हिडीओ-
विराट कोहली सलामीला येणार-
कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला उतरतील. तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. दरम्यान विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या जागेची अदलाबदल देखील होऊ शकते. म्हणजेच विराट कोहली रोहित शर्मासोबत सलामीला खेळतानाही दिसू शकतो. मधल्या फळीची सुरुवात श्रेयस अय्यरपासून होऊ शकते. यानंतर केएल राहुल पाचव्या क्रमांकावर दिसू शकतो. एकदिवसीय मालिकेत ऋषभ पंतच्या जागी केएल राहुलला प्राधान्य दिले जाऊ शकते. यानंतर रियान पराग सहाव्या क्रमांकावर दिसू शकतो. भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रियान पराग वनडेमध्येही पदार्पण करू शकतो. परागने टी-20 मालिकेत उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी दाखवली, हे लक्षात घेऊन त्याला एकदिवसीय संघात स्थान मिळू शकते. त्यानंतर अष्टपैलू अक्षर पटेल सातव्या क्रमांकावर दिसू शकतो. याशिवाय गोलंदाजीत कुलदीप यादवकडे मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून पाहिले जाऊ शकते. तर वेगवान गोलंदाजीत मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि खलील अहमद मैदानात उतरतील.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
संबंधित बातमी:
MS धोनीसाठी काहीपण! चेन्नई सुपर किंग्सची बीसीसीआयसमोर अनोखी मागणी; काव्या मारनसह अनेक मालक विरोधात