Ashwin Test Record : रविचंद्रन अश्निनने (R Ashwin) माजी क्रिकेटपटू कपिल देवचा (Kapil Dev) रिकॉर्ड मोडला आहे. अश्विनने 435 विकेट घेत कपिल देवचा 434 विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. आर अश्विनने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 435 विकेट्स घेतल्या आहेत. या बाबतीत त्याने कपिल देवला (Kapil Dev) मागे टाकले आहे. श्रीलंकन खेळाडू चरिथ असलंकाची (Charith Asalanka) विकेट अश्विनच्या कसोटी क्रिकेटमधील 435 वी विकेट ठरली आहे. त्याच्या मागोमाग कपिल देव 434 विकेटसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सर्वाधिक 619 विकेट्स अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) नावे आहेत.


कसोटीमध्ये 400 हून अधिक विकेट घेणारा चौथा गोलंदाज


कसोटी क्रिकेटमध्ये 400 हून अधिक विकेट घेणारा अश्विन हा चौथा भारतीय गोलंदाज आहे. मोहाली येथे सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत अश्विनने न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडली (431) आणि श्रीलंकेच्या रंगना हेराथ (432) यांना मागे टाकून तो आतापर्यंतचा नववा सर्वाधिक कसोटी विकोट घेणारा गोलंदाज ठरला. सक्रिय कसोटी क्रिकेटपटूंमध्ये, अश्विन हा इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज जोडी स्टुअर्ट ब्रॉड (537) आणि जेम्स अँडरसन (640) नंतर तिसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.



  1. मुथय्या मुरलीधरन - 133 कसोटीत 800 विकेट्स

  2. शेन वॉर्न - 145 कसोटीत 708 विकेट्स

  3. जेम्स अँडरसन - 169 कसोटीत 640 विकेट्स

  4. अनिल कुंबळे - 132 कसोटीत 619 विकेट्स

  5. ग्लेन मॅकग्रा - 124 कसोटीत 563 विकेट्स

  6. स्टुअर्ट ब्रॉड - 152 कसोटीत 537 विकेट्स

  7. कोर्टनी वॉल्श - 132 कसोटीत 519 विकेट्स

  8. डेल स्टेन - 93 कसोटीत 439 विकेट्स

  9. आर अश्विन - 85 कसोटीत 435* विकेट्स


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha