IND vs SL Test Match, Day 3 : मोहालीत भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस सुरु आहे. या पहिल्या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. कारण, श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 174 धावांवर आटोपला आहे. भारताकडून रविंद्र जडेजाने 41 धावात 5 बळी घेतले आहेत. त्यामुळे भारताकडे या पहिल्या कसोटी सामन्यात मोठी आघाडी झाली आहे. दरम्यान, भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिला आहे. श्रीलंकेने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून, 10 धावांवर श्रीलंकेची एक विकेट गेली आहे.
दरम्यान, काल पहिला डाव भारताने 574 धावांवर घोषीत केला होता. त्यानंतर श्रीलंकेने आपल्या पहिल्या डावाला काल सुरुवात केली होती. काल दुसरा दिवस संपताना भारताकडे 466 धावांची आघाडी होती. काल श्रीलंकेने 4 गड्यांच्या मोबदल्यात 108 धावा केल्या होत्या. त्यानंतर आज सकाळी श्रीलंकेने खेळ सुरु केल्यावर भारतीय संघाने दमदार गोलदांजी करत श्रीलंकेला 174 धावांवर रोखले.
दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजाची निर्णय घेतला. पहिल्या दिवशी भारतीय संघाने 85 षटकांत 6 बाद 357 धावा केल्या. पहिल्या दिवशी ऋषभ पंतने 97 चेंडूमध्ये 96 धावा केल्या. तर हनुमा विहारीने 128 चेंडूत 58 धावा केल्या. विराट कोहलीचा हा शंभरावा कसोटी सामना आहे. मात्र कोहली 45 धावा करुन तंबूत परतला होता. दुसऱ्या दिवशी जाडेजाने उत्तम सुरुवात केली त्याला आश्विनची साथ मिळाली. आश्विन 61 धावा करुन बाद झाला तर जाडेजा 175 धावांवर नाबाद राहिला. अखेर 574 धावांवर भारताने डाव घोषित केला. त्यानंतर श्रीलंकेने आपला पहिला डाव सुरु केला होता. सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली. आश्विनने 2 आणि जडेजा, बुमराहने प्रत्येकी 1-1 विकेट घेत दिवस अखेर श्रीलंकेची अवस्था 108 वर 4 बाद अशी केली होती. आज पुन्हा जडेजाने उत्तम कामगिरी करत श्रीलंकेला धक्के दिले.
महत्त्वाच्या बातम्या:
- IND vs SL, 1st Test: रविंद्र जडेजानं रचला इतिहास, कपिल देवचा 'हा' विक्रम मोडला
- Virat Kohli Test Runs : शंभराव्या कसोटीत 8000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली दुसरा फलंदाज
- 'अनुष्का ग्राऊंडवर काय करतेय?' विराट कोहलीच्या 100व्या कसोटी सामन्या दरम्यान नेटकऱ्यांकडून ट्रोल