Viral News : चीन (China) त्याच्या विचित्र खाद्यपदार्थांसाठी ओळखला जातो. सध्या नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) चीनचे असे धोकादायक खाद्य पाहायला मिळत आहे, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. चीनच्या या स्पेशल डिशमध्ये दोन विषारी प्राण्यांचा वापर करुन 'डिटॉक्स सूप'  (Detox Soup)बनवलं आहे. या विचित्र सूपची मागणी चीनमध्ये सातत्याने वाढत आहे. यामध्ये विषारी साप, विंचू यांचा वापर केला जात आहे. चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात ही धोकादायक डिश विकली जात आहे, जी लोकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे.


हे एक प्रकारचे डिटॉक्स सूप (Detox Soup) आहे. तर, चिनी लोकांच्या मते, ते हे सूप शरीर डिटॉक्स करण्यासाठी सेवन करतात. हे सूप बनवण्यापूर्वी साप आणि विंचूचे विष काढले जाते आणि हे सूप बनवण्यासाठी विंचू आणि साप तीन तास​शिजवले जातात. सध्या सोशल मीडियावर हे धोकादायक सूप सर्वांनाच आश्चर्यचकित करताना दिसत आहे.



खाद्यपदार्थ विक्रेते पारंपरिक खाद्यपदार्थासोबत सतत नवनवीन प्रयोग करताना दिसतात. यादरम्यान अनेकवेळा काही स्ट्रीट फूड विक्रेते चांगले अन्नपदार्थ शोधत असतात. दुसरीकडे, बहुतेक प्रकरणांमध्ये अनेक विचित्र अन्नपदार्थ तयार होतात. चीनमध्ये असे अनेक विचित्र खाद्यपदार्थ बनवले जातात आणि अनेक वेळा त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha