IND vs SL LIVE Update : भारताचा श्रीलंकेवर एक डाव 222 धावांनी विजय
IND vs SL LIVE Update : टीम इंडियाचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पाहा सामन्यासंदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
भारताने एक डाव आणि 222 धावांनी सामना जिंकत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.
भारतीय खेळाडू अप्रतिम कामगिरी करत विजयाच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. विजयासाठी भारताला एका विकेटची गरज आहे.
मोहालीत भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस सुरु आहे. या पहिल्या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. कारण, श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 174 धावांवर आटोपला आहे. भारताकडून रविंद्र जडेजाने 41 धावात 5 बळी घेतले आहेत. त्यामुळे भारताकडे या पहिल्या कसोटी सामन्यात मोठी आघाडी झाली आहे. दरम्यान भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिला आहे. पहिला डाव भारताने 574 धावांवर घोषीत केला होता.
दुसऱ्या दिवशी भारताने अप्रतिम खेळ करत दिवसअखेर श्रीलंकेचे 4 गडी तंबूत धाडले आहेत. श्रीलंकेने 108 धावा केल्या असल्याने भारताकडे सध्या 466 धावांची आघाडी आहे.
जसप्रीत बुमराहने अॅन्जोलो मॅथ्यूजला 22 धावांवर बाद करत भारताला तिसरं यश मिळवून दिलं आहे.
भारतानं 574 धावा स्कोरबोर्डवर लावल्यानंतर आता गोलंदाजीची सुरुवात उत्तम केली आहे. भारताने दोन ऑस्ट्रेलियाचे गडी तंबूत धाडले आहेत. 32 ओव्हरनंतर श्रीलंकेचा स्कोर 83/2 असा आहे. जाडेजा आणि आश्विनने एक-एक विकेट घेतली आहे.
IND vs SL LIVE Update : रविंद्र जाडेजाची पावणेदोनशे धावांची खेळी, भारतानं 574 धावांवर घोषित केला डाव
IND vs SL LIVE Update : सर रविंद्र जाडेजा सुसाट! दीडशतक झळकावलं, भारत 500 पार
IND vs SL LIVE Update : जयंत यादव दोन धावांवर बाद, जाडेजाच्या साथीला मोहम्मद शामी मैदानात, भारत 500 धावांच्या उंबरठ्यावर
IND vs SL LIVE Update : आर अश्विन 61 धावांवर बाद, भारताच्या 7 विकेट्सवर 462 धावा, जाडेजा 99 धावांवर नाबाद
IND vs SL LIVE Update : आर अश्विनचं शानदार अर्धशतक, रविद्र जाडेजा शतकाच्या उंबरठ्यावर, भारताचा धावांचा डोंगर
भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. 228 धावांच्या स्कोअरवर भारताला पाचवा धक्का बसला आहे. फिरकीपटू धनंजय डी सिल्वाने श्रेयस अय्यरला 27 धावांवर एलबीडब्ल्यू केले. त्याच्या जागी रवींद्र जडेजा फलंदाजीला आला.
टी-ब्रेकनंतर सामना सुरू झाला असून भारताने 4 विकेट्स गमावल्या आहेत. टीम इंडियाची धावसंख्या 200 च्या पुढे गेली आहे. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांची जोडी मैदानात आहे.
मोहाली कसोटीच्या पहिल्या दिवशी टी-ब्रेकपर्यंत टीम इंडियाने 4 विकेट गमावून 199 धावा केल्या आहेत. सध्या ऋषभ पंत 12 आणि श्रेयस अय्यर 14 धावा करून फलंदाजी करत आहेत.
भारतीय संघाने 175 धावांवर चौथी विकेटही गमावली. कोहलीच्या पाठोपाठ हनुमा विहारीही पॅवेलियनमध्ये परतला आहे. त्याने 58 धावांची खेळी खेळली. फर्नांडोने हनुमाला क्लीन बोल्ड केले. सध्या ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरची जोडी मैदानात आहे.
विराट कोहली 45 धावांवर क्लीन बोल्ड झाला आहे. 170 धावांवर टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का बसला. कोहली 45 धावा करून बाद झाला. त्याने लसिथ एम्बुल्डेनियाचा फिरकी चेंडू चुकवला आणि क्लीन बोल्ड झाला. कोहलीची ही 100वी कसोटी आहे. त्याच्या जागी ऋषभ पंत फलंदाजीसाठी उतरला आहे.
भारताचा आघाडीचा फलंदाज हनुमा विहारीने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. त्याने आपल्या कारकिर्दीतील पाचवे कसोटी अर्धशतक झळकावले. यासोबतच त्याने विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली.
दुपारच्या जेवणानंतर भारत-श्रीलंका खेळ पुन्हा सुरू झाला. 100 वी कसोटी खेळत असलेल्या विराट कोहलीने हनुमा विहारीसोबत आघाडी घेतली आहे. दोघेही फलंदाजी करत आहेत.
मोहाली कसोटीच्या पहिल्या दिवशी लंच टाइमपर्यंत भारतीय संघाने 2 गडी गमावून 109 धावा केल्या आहेत. सध्या विराट कोहली 19 आणि हनुमा विहारी 34 धावा करून क्रीजवर कायम आहे.
भारतीय संघाच्या धावसंख्येने 2 विकेट्सवर 100 धावा ओलांडल्या आहेत. या क्षणी, भारताची धावसंख्या 102/2 (24) आहे. विराट कोहली आणि हनुमा विहारी फलंदाजी करत आहेत.
भारतीय संघाच्या धावसंख्येने 2 विकेट्सवर 100 धावा ओलांडल्या आहेत. या क्षणी, भारताची धावसंख्या 102/2 (24) आहे. विराट कोहली आणि हनुमा विहारी फलंदाजी करत आहेत.
टीम इंडियाला 80 धावांवर दुसरा मोठा धक्का बसला. सलामीवीर मयांक अग्रवालही 33 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला लसिथ एम्बुल्डेनियाने एलबीडब्ल्यू आऊट केले. विराट कोहली मैदानात कायम आहे.
भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. रोहित शर्मा कर्णधार म्हणून पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्या डावात केवळ 29 धावांवर बाद झाला. रोहितला लाहिरू कुमाराने कॅच घेऊन बाद केले. रोहितच्या जागी हनुमा विहारी फलंदाजीला आला. टीम इंडियाला 52 धावांवर पहिला धक्का बसला.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत मयंक अग्रवाल सलामीसाठी मैदानात उतरले आहेत. श्रीलंकेच्या संघासाठी वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलने पहिली ओव्हर टाकली.
पार्श्वभूमी
IND vs SL Test : भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्यामध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या कारकिर्दीतील ही 100वी कसोटी आहे. तर रोहित शर्मासाठीही हा सामना फार महत्त्वाचा मानला जात आहे.
श्रीलंकेचा संघ पाच वर्षानंतर भारत दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. शेवटच्या वेळी 2017 मध्ये श्रीलंकेने भारतीय भूमीवर तीन कसोटी सामन्यांची मालिका 0-1 ने गमावली होती. क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेच्या संघाने भारतीय भूमीवर एकही कसोटी जिंकलेली नाही. त्याने आतापर्यंत 20 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 11 सामने तो पराभूत झाला आहे, तर 9 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.
मोहालीमध्ये शुक्रवारपासून सुरू होणारा कसोटी सामना विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासाठी खूप खास असेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात होणारा हा सामना कोहलीच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना (Virat Kohli's 100 th Test Match) असेल. दुसरीकडे, रोहित शर्मा हा सामना जिंकून भारताचा 35 वा कसोटी कर्णधार म्हणून धमाकेदार कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.
भारताने 1932 मध्ये कसोटी (Test Cricket) क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून, अनेक खेळाडू आहेत ज्यांच्या विशिष्ट कामगिरीने गाजल्या आहेत. सुनील गावस्कर यांच्या 10,000 धावा असो किंवा सचिन तेंडुलकरला भावनिक निरोप असो. आता सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर लागल्या आहेत. विराटचा 100वा कसोटी सामना सध्या चर्चेचा विषय आहे. या 100व्या कसोटी सामन्यात शतक ठोकण्याचा अंदाज बांधला जात आहे.
कोहलीला सुरंगा लखमल, लाहिरू कुमारा किंवा लसिथ एम्बुल्डेनियासारख्या गोलंदाजांसह श्रीलंकेच्या आक्रमणाचा सामना करण्यास काही त्रास होईल असे वाटत नाही. कोहलीला त्याच्या कव्हर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, फ्लिक्स आणि पुल्सने त्याच्या चाहत्यांना मोहित करायला नक्कीच आवडेल.
या कसोटी सामन्याने रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचाही नवा प्रवास सुरू होईल. मर्यादित षटकांच्या आव्हानामध्ये रोहित शर्माच्या यशाबद्दल सर्वांनाच माहिती आहे, विशेषत: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) जिथे तो महेंद्रसिंग धोनीसारख्या खेळाडूंना आव्हान देत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -