कोलंबो : सध्या भारतीय पुरुष क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. तेथे भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदीवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 2 ऑगस्ट रोजी पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांनी विजयी कामगिरी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. मात्र हा सामना शेवटी ड्रॉ झाला. दरम्यान, याच सामन्यातील भारताचा यष्टीरक्षक के एल राहुल याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सामना चालू असताना राहुलने आयपीएलचा उल्लेख करत एका नियमाबाबत विचारले आहे. राहुलच्या या संभाषणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
नेमकं काय घडलं?
नाणेफेक जिंकून श्रीलंकेने आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 14 व्या षटक टाकण्यासाठी शिवम दुबे याच्याकडे चेंडू सोपवण्यात आला होता. भारताला एका विकेटची गरज होती. या षटकात एक चेंडू श्रीलंकेच्या पथुम निसंकाच्या पॅड्सला लागून यष्टीरक्षक के एल राहुलच्या हातात गेला. त्यानंतर लगेच केएल राहुलने कर्णधार रोहित शर्माकडे धाव घेतली आणि एक प्रश्न विचारला.
आंतरराष्ट्रीय सामन्यांत आयपीएलमधील नियम आहे का? असा सवाल त्याने कर्णधार रोहित शर्माला केला. रोहित शर्मा-केएल राहुल तसेच इतर भारतीय खेळाडू यांच्यातील संभाषण स्टंप्सवर असलेल्या माईकमध्ये रेकॉर्ड झाले आहे. विशेष म्हणजे सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग चालू असताना हे संभाषण सर्वांनी ऐकले. याच संभाषणाच्या काही क्लिप्स सध्या सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. के एल राहुलच्या या प्रश्नावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
राहुलने आयपीएलच्या नियमाची का विचारणा केली?
आंतरराष्ट्रीय सामन्यात राहुलने आयपीएलच्या नियमाबाबत का विचारणा केली? असा प्रश्न विचारला जातोय. पंचाने एखाद्या चेंडूला वाईड असल्याचा निर्णय दिल्यास त्याच्या निर्णयाला आव्हान देता येते. डीआरएसच्या मदतीने हे आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे हाच नियम आंतरराष्ट्रीय सामन्यांत लागू होतो की नाही? याची के एल राहुलने विचारणा केली. आयपीएलचे काही नियम आंतरराष्ट्रीय सामन्यांत लागू होत नाहीत. याच कारणामुळे के एल राहुलला अनेकजण ट्रोल करत आहेत.
पहिला सामना ड्रॉ
दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील यांच्यातील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना ड्रॉ झाला. श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी 231 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताच्या रोहित शर्मा वगळता अन्य कोणत्याही खेळाडून खास कामगिरी केली नाही. त्यामुळे सर्व गडी बाद झाले तेव्हा 230 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे हा सामना ड्रॉ झाला.
हेही वाचा :