नवी दिल्ली : टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद आणि झिम्बॉब्वे विरुद्धची टी 20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ (Team India Sri Lanka Tour) आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. या मालिकेपासून भारताचा प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) कार्यकाळ सुरु होणार आहे. सुरुवातीला रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली वनडे मालिकेत खेळताना दिसणार नाहीत अशी चर्चा होती. मात्र, गंभीरच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सुरु होत असल्यानं दोघांनी देखील वनडे मालिकेसाठी उपलब्ध असल्याचं कळवलं. त्यामुळं रोहित शर्माची वनडे टीमचा कॅप्टन म्हणून निवड झाली आहे.  भारताच्या वनडे टीममध्ये आयपीएल गाजवणाऱ्या युवा गोलंदाजाची निवड झाली आहे. केकेआरचा युवा गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) याच्यासाठी टीम इंडियाची दारं उघडली आहेत. 


हर्षित राणानं आयपीएल गाजवलं


गौतम गंभीरनं 2024 च्या आयपीएलमध्ये केकेआरचा मेंटॉर म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेआरनं आयपीएलचं विजेतेपद मिळवलं. केकेआरनं विजेतेपद मिळवलं त्यामध्ये फलंदाजांप्रमाणं गोलंदाजांची भूमिका देखील महत्त्वाची होती. हर्षित राणानं आयपीएलमध्ये एकूण 19विकेट घेतल्या होत्या. आता श्रीलंका दौऱ्यात हर्षित राणाला संधी मिळाली आहे.  हर्षित राणा हा दिल्लीचा युवा खेळाडू आहे. आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. आयपीएलच्या 17 व्या हंगामात त्यानं 19 विकेट घेतल्या होत्या. गौतम गंभीरनं श्रीलंका दौऱ्यात युवा खेळाडूवर विश्वास टाकला आहे. हर्षित राणाला वनडे संघातील  15 सदस्यांमध्ये स्थान दिलं गेलं आहे. 


हर्षित राणानं टीम इंडियाच्या 15 जणांच्या संघामध्ये स्थान मिळताच भावना व्यक्त केल्या आहेत. आतापर्यंतच्या क्रिकेटच्या प्रवासातील कामगिरीचं श्रेय तीन व्यक्तींना द्यायचं असल्याचं तो म्हणाला. यामध्ये हर्षित राणानं त्याचे वडील, प्रशिक्षक अमित भंडारी आणि गौतम गंभीरला दिलं आहे. क्रिकेटबद्दल माझा दृष्टीकोन कोलकाता नाईट रायडर्सच्या ड्रेसिंग रुममध्ये गौतम गंभीरनं केलेल्या मार्गदर्शनामुळं बदलल्याचं हर्षित राणानं म्हटलं. हर्षित राणा म्हणाला की गौती भैय्या नेहमी सांगायचे, तुझ्यावर विश्वास आहे तू मॅच जिंकून येशील, त्यामुळं  आत्मविश्वास मिळाल्याचं हर्षित राणानं म्हटलं. 


वनडे मालिकेसाटी टीम इंडिया 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर)ऋषभ पंत (विकेटकीपर),श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शधीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा


संबंधित बातम्या :


भारताच्या लेकी पाकिस्तानशी भिडणार, महिला आशिया कपचं संपूर्ण वेळापत्रक, रणसंग्राम सुरु