Yuvraj Singh on Twitter: भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा अखेरचा सामना तिरुवनंतीपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने दमदार सुरुवात केली आहे. सलामीवीर शुभमन गिलने एक ताबडतोड शतक झळकावलं. ज्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे, पण यादरम्यानच माजी क्रिकेटर युवराज सिंह (Yuvraj Singh) याच्या प्रतिक्रियेतून सर्वच क्रिकेट जगताला विचार करायला लावणारी एक गोष्ट समोर आली आहे. युवीने ट्वीटमध्ये मैदानात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना सुरु असतानाही बऱ्याच ठिकाणी रिकाम्या खुर्च्या असल्याने चिंता दर्शवत 'एकदिवसीय क्रिकेट संपतंय का?' असा प्रश्न विचारला आहे. 


काय म्हणाला युवराज?


शुभमननं शतक करताच युवराजने त्याला ट्वीट करत शुभेच्छा दिल्या, शुभमनला टॅग करत चांगला खेळला. दमदार शतक मारलंस कोहलीही दुसऱ्या बाजूला उत्तम खेळत होता. पण मला चिंता एकाच गोष्टीची वाटते ती म्हणजे केवळ अर्ध भरलेलं स्टेडियम. एकदिवसीय क्रिकेट संपत आहे का?


युवराज सिंहचं ट्वीट






इरफान खानचा भन्नाट रिप्लाय


दरम्यान युवराजनं केलेलं हे ट्वीट तसं गंभीर आहे, त्यावर अनेकजण तसेच रिप्लायही देत आहेत. पण काहीजण मजेशीर रिप्लायही देत असून माजी अष्टपैलू इरफान पठाणने अगदी भन्नाट रिप्लाय दिला आहे. त्याने युवराजला चल तूच पॅड घालून मैदानात खेळायला उतर म्हणजे आपोआप लोकं येतील असं म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिकिट्सची वाढती किंमत हे याला कारण असल्याचंही म्हटलं आहे. दरम्यान या ट्वीटची बीसीसीआय काही दखल घेणार का? हे पाहावं लागेल.






भारताची मालिकेत आघाडी


भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडियाने यापूर्वीच श्रीलंकेवर 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला हा सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईट वॉश द्यायचा आहे. 


हे देखील वाचा-