Jasprit Bumrah On Pink Ball:  भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना 12-16 मार्चदरम्यान बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर खेळवला जाणार आहे. हा दिवस-रात्र सामना असून पिंक बॉलनं खेळला जाणार आहे. पिंक बॉल कसोटी सामन्यात भारताचं प्रदर्शन आतापर्यंत चांगलं राहिलं आहे. परंतु, पिंक बॉल संदर्भात भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहनं स्वत:चं मतं मांडलंय. तसेच पिंक बॉलनं खेळताना कोणत्या समस्यांना समोरं जावा लागतं? यावरही त्यानं भाष्य केलंय. 


 पिंक बॉलनं कसोटी सामना खेळताना क्रिकेटपटूंना मानसिकदृष्या जुळवून घ्यावं लागतं. परंतु आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीनही दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये परिस्थिती वेगळी होती, असं जसप्रीत बुमराहनं म्हटलंय. प्रत्येक संघ पिंक बॉलनं क्रिकेट खेळण्यासाठी सराव करीत आहेत. क्रिकेटपटू म्हणून आम्हाला परिस्थितीशी झटपट जुळवून घ्यावी लागेल. क्षेत्ररक्षण करताना बॉलचा लवकर अंदाज येत नाही. इतर चेंडूच्या तुलनेत पिंक बॉल अधिक वेगानं येतो, असं जसप्रीत बुमराहनं म्हटलंय. 


भारताला उद्यापासून श्रीलंकाविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना खेळायचा आहे. भारतानं आतापर्यंत तीन दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत. भारतानं यापूर्वी, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध पिंक बॉलनं सामना खेळला आहे. 


भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्यानं आतापर्यंत 28 कसोटी आणि 70 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 115 तर, एकदिवसीय सामन्यात 113 विकेट्स घेतले आहेत. तर, 57 टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 67  विकेट्स घेतल्या आहेत. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha