IND vs SL, 1st Test, Mohali: भारत आणि श्रीलंका या दोन संघादरम्यान सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. यामध्ये भारताने सहा गड्यांच्या बदल्यात 357 धावा केल्या आहेत. आपला शंभरावा कसोटी सामना खेळत असलेला विराट कोहली 45 धावांवर बाद झाला आहे. आर अश्विन 10 धावांवर तर रविंद्र जाडेजा 45 धावांवर खेळत आहे.
मोहाली येथे भार विरुद्ध श्रीलंका या दोन संघामधील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला आज सुरूवात झाली. टॉस जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसाअखेर भारताने 85 षटकांमध्ये सहा गड्यांच्या बदल्यात 357 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक म्हणजे 96 धावा केल्या आहेत. त्याचे शतक केवळ चार धावांनी हुकलं.
रोहित शर्माचा कसोटी कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना आहे. रोहित शर्मा भारताच्या कसोटी संघाचा 35 वा कर्णधार ठरला आहे.
विराट कोहीलीची 100 वी कसोटी, 8000 धावा पूर्ण
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आपला 100 वा कसोटी सामना खेळत आहे. त्यामुळे त्याच्या फलंदाजीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कोहलीला आज केवळ 45 धावा करता आल्या, लसिथ एम्बुलडेनियाने बोल्ड केले.
कसोटी क्रिकेटमध्ये आठ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा भारताचा सहावा खेळाडू आहे. कोहलीने आपल्या 100व्या कसोटीच्या 169व्या डावात 8000 धावा पूर्ण केल्या. याशिवाय 100 व्या कसोटीत आठ हजार धावांना गवसणी घालणारा विराट हा ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉण्टिंगनंतरचा दुसराच खेळाडू आहे.
संबंधित बातम्या:
- IND vs SL, Mohali Test : कोहलीविषयी केलेली भविष्यवाणी खरी ठरली; शंभराव्या कसोटीत विराटच्या 45 धावा, लसिथ एम्बुलडिनियाने केलं बोल्ड
- Virat Kohli Test Runs : शंभराव्या कसोटीत 8000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली दुसरा फलंदाज
- Women's World Cup : आजचे Google Doodle महिला क्रिकेटसाठी समर्पित! विश्वचषकाला जोरदार सुरूवात