IND vs SA 3rd T20 Playing 11 : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सुरु असलेल्या टी20 मालिकेत भारत 2-0 च्या पिछाडीवर असल्याने आणखी एक सामनाही भारताने गमावल्यास मालिका भारताच्या हातातून निसटणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला आजच्या सामन्यात करो या मरो अशी स्थिती आहे. त्यामुळे आज सामना खेळताना सर्व खेळाडू विजयासाठी नक्कीच प्रयत्नांची शिकस्त करतील. अशात पहिल्या दोन सामन्यांतील खेळाडूंच्या खेळीनुसार काही बदलही होऊ शकतात. तर मालिकेतील हा तिसरा सामना विशाखापट्टणमच्या मैदानात खेळवला जाणार असून गोलंदाजांसाठी हा पिच अधिक फायद्याचा असल्याने नव्या गोलंदाजांना संधी दिली जाऊ शकते.
यंदा भारतीय संघाची निवड करताना आयपीएलमधील कामगिरीनुसार खेळाडूंना संधी देण्यात आली. त्यामुळे युवा गोलंदाज अर्शदीप सिंह, उमरान मलिक यांना भारतीय संघाचं तिकीट मिळालं. तर दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या या दिग्गजांचं पुनरागमन झालं. दरम्यान आवेश, ऋतुराज यांनाही यावेळी संधी मिळाली असून दोघांनी आतापर्यंतच्या सामन्यात खास कामगिरी केलेली नाही. ज्यामुळे आता उमरान आणि अर्शदीप यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यात गोलंदाजांसाठी अधिक फायदा या खेळपट्टीवर असल्याने दोघांनाही संधी मिळू शकते.
विशाखापट्टणमच्या टी 20 सामन्यातील संभावित प्लेईंग 11 - ईशान किशन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, उमरान मलिक.
हे देखील वाचा-
- Nupur Sharma News : नुपूर शर्मा प्रकरणावर क्रिकेटपटूंनीही दिली प्रतिक्रिया, शोएब अख्तर म्हणाला...
- Kane Williamson : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकवून देणाऱ्या केनची जागा टॉम लेथम घेणार? न्यूझीलंड कसोटी संघाचा कर्णधार बदलण्याची शक्यता
- IND vs SA: कटक टी-20 सामन्यात हजारो प्रेक्षकांनी गायलं 'माँ तुझे सलाम!', पाहा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ