India vs South Africa, 1st Test Playing XI Update : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 14 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 संदर्भात मोठे अपडेट समोर आले आहे. सर्वात मोठा प्रश्न असा होता की ऋषभ पंतच्या पुनरागमनानंतर ध्रुव जुरेलला संधी मिळेल का? पण आता मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही खेळाडूंना पहिल्या कसोटीत जागा मिळणार आहे.

Continues below advertisement


प्लेइंग-11 बाबत मोठी अपडेट


सूत्रांच्या माहितीनुसार, ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल दोघांनाही पहिल्या कसोटीत स्थान मिळणार आहे. पंत विकेटकीपरच्या भूमिकेत दिसेल, तर जुरेलला स्पेशालिस्ट बॅटर म्हणून खेळवले जाणार आहे. टीम मॅनेजमेंटने त्याच्या अलीकडच्या चमकदार फॉर्मला पाहता त्याला बाहेर ठेवण्याचा धोका घेणार नाही.


ध्रुव जुरेलने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध शानदार फलंदाजी केली होती आणि सातत्याने धावा केल्या होत्या. याचबरोबर वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याने आपले पहिले कसोटी शतक झळकावले होते. या कामगिरीमुळे निवड समिती प्रभावित झाली आणि आता तो टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये आपले स्थान पक्के केले आहे.


कोणाचा पत्ता कट होणार?


जुरेल जर संघात आला तर एका खेळाडूला बाहेर बसावे लागणार आहे. टीममधील सूत्रांच्या मते, ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला या सामन्यात विश्रांती मिळू शकते. भारतीय परिस्थितीत त्याच्या गोलंदाजीची फारशी गरज नसल्याने आणि फलंदाजीत जुरेल अधिक विश्वासार्ह मानला जात असल्याने ही बदलण्याची शक्यता आहे.


बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, “ध्रुव जुरेल स्पेशालिस्ट बॅटर म्हणून खेळेल. टीम मॅनेजमेंट साई सुदर्शनला नंबर तीनवर कायम ठेवू इच्छिते, त्यामुळे नितीश रेड्डीच्या जागी जुरेलला स्थान मिळेल.”


पंतच्या पुनरागमनाने टीमला मोठा बूस्ट


दीर्घ काळानंतर ऋषभ पंत पुन्हा कसोटी संघात परतला आहे. अपघातानंतर आणि दीर्घ पुनर्वसनानंतर तो पुन्हा विकेटच्या मागे दिसणार आहे. पंतची आक्रमक फलंदाजी आणि अनुभव भारतीय संघासाठी मोठा फायदा ठरणार आहे. जर रेड्डी बाहेर बसला, तरी भारताकडे पाच गोलंदाजीचे पर्याय असतील. ज्यात रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर फिरकी विभागाची जबाबदारी सांभाळतील.


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग-11 :


शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा कसोटी संघ- (India Test Squad vs South Africa 2025 Test)


शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.


हे ही वाचा -


भुरट्या संघाला हरवून पाकिस्ताननी ट्रॉफी जिंकली, पण सोशल मीडियावर चर्चा मात्र हार्दिक पांड्याची झाली, मैदानात नेमकं काय घडलं?