IND vs SA Test Records : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यामध्ये आजपासून बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day test Match) सामन्याला सुरुवात होणार आहे. या दोन्ही देशांमध्ये 31 वर्षांपासून क्रिकेटच्या मैदानावर लढई होत आहे. 1992 मध्ये या दोन्ही संघात (IND vs SA) पहिल्यांदा कसोटी सामना झाला होता, तेव्हापासून 42 वेळा हे दोन संघ आमने सामने आले होते. कसोटी सामन्याच्या इतिहासावर नजर मारल्यास आफ्रिकेचं पारड जड दिसतेय. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत 17 वेळा भारतीय संघाचा पराभव केलाय. तर टीम इंडियाला 15 वेळा विजय मिळवता आलाय. या दोन्ही संघातील दहा सामने अनिर्णित राहिलेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) या दोन्ही संघातील मोठ्या विक्रमाबाबत जाणून घेऊयात..


1. सर्वोच्च धावसंख्या कोणत्या संघाची : फेब्रुवारी  2010 मध्ये ईडन गार्डन्वर झालेल्या सामन्यात भारताने दुसऱ्या डावात भारताने सहा विकेट्सच्या मोबदल्यात 643 धावा चोपल्या आहेत.


2. निचांकी धावसंख्या : डिसेंबर 1996 मध्ये डरबन कसोटीच्या चौथ्या डावात भारतीय संघ फक्त 66 धावांत तंबूत परतला होता.  


3. सर्वात मोठा विजय: हा विक्रमही भारतीय संघाच्या नावावर आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये रांची कसोटी सामन्यात भारताने आफ्रिकेचा एक डाव आणि 202 धावांनी पराभव केला होता.


4. सर्वात लहान विजय : फेब्रुवारी 2000 मध्ये वानखेडे कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकाने भारतीय संघाचा चार विकेटने पराभव केला. 


5. सर्वाधिक धावा : सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक धावा आहे. सचिन तेंडुलकरने आफ्रिकाविरोधात 1741 धावा चोपल्यात. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जॅक कॅलिस आहे. कॅलिसने 1734 धावा केल्यात.  


6. सर्वात मोठी धावसंख्या : वीरेंद्र सहवाग याच्या नावावर सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आहे. मार्च 2008 मध्ये चेन्नई कसोटीत सहवागने 319 धावांची खेळी केली. 


7. सर्वाधिक शतकं : सचिन आणि जॅक्स कॅलिस यांच्या नावावर सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे. त्यांनी प्रत्येकी सात सात शतकं ठोकली आहेत.


8. सर्वाधिक विकेट : भारत आणि दक्षिण आफ्रिकामध्ये अनिल कुंबळे याने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. कुंबळेच्या नावावर 84 विकेट आहेत. दुसर्या क्रमांकवर डेल स्टेन आहे, त्याने 65 विकेट घेतल्यात.  


9. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी : दक्षिण अफ्रिकेच्या अॅलन डोनल्ड याने डिसेंबर 1992 मध्ये 139 धावा देऊन 12 विकेट घेतल्या. आर. अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने 98 धावा देऊन 12 विकेट घेतल्यात.  


10. सर्वात मोठी भागिदारी : रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी 2019 मध्ये पहिल्या विकेटसाठी 317 धावांची भागिदारी केली.