India vs South Africa, 1st T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी20 मालिकेचा पहिला सामना दिल्ली येथे 9 जून रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यांसाठी भारताने सराव देखील सुरु केला आहे. केएल राहुल संघाचा कर्णधार असणार असून बऱ्याच युवा खेळाडूंना देखील या वेळी संधी देण्यात आली आहे. दरम्यान या सामन्यांसाठी फभारतीय संघाने आता सरावाला देखील सराव केली असून बीसीसीआयने (BCCI) एक व्हिडीओ देखील यावेळी पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये टीम इंडिया सराव करताना दिसत आहे. ज्यामध्ये कोच राहुल द्रविड, दिग्गज खेळाडू दिनेश कार्तिक, विकेटकीपर ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंह यांच्यासह बरेच खेळाडू दिसत आहेत.  

टी-20 क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड रेकार्ड

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 15 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहा सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, फक्त एकच सामना गमावला आहे.

याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला. 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांचे वेळापत्रक

सामना दिनांक  ठिकाण
पहिला टी20 सामना 9 जून अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
दुसरा टी20 सामना 12 जून बाराबती स्टेडियम, कट्टक
तिसरा टी20 सामना 14 जून डॉ वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम,विशाखापट्टणम
चौथा टी20 सामना 17 जून सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम, राजकोट
पाचवा टी20 सामना 19 जून एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु

हे देखील वाचा-