South Africa vs India 1st Test : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील कामगिरीची पुनरावृत्ती भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकामध्ये करुन दाखवली आहे. भारतीय संघाने यजमान दक्षिण अफ्रीकेचा सेंच्युरियन मैदानावर 113 धावांनी पराभव केला. या मैदानावर यजमानांनी आतापर्यंत वर्चस्व गाजवलं आहे. या मैदानावर यजमांनी 81 टक्के सामने जिंकले आहेत. आतापर्यंत 21 सामन्यात यजमानांनी विजय साकार केलाय. तर फक्त दोन सामन्यात पराभव मिळाला होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा अपवाद वगळता दक्षिण आफ्रिका  सेंच्युरियन मैदानावर अजेय होती. आशिया संघाला तर इथे कधीच विजय मिळवता आलेला नव्हता. मात्र, आज भारतीय संघाने सेंच्युरियन मैदानावर विजय साजरा करत इतिहास रचला आहे. सेंच्युरियन मैदानावर यजमानांचा पराभव करणारा भारत आशियातील पहिला संघ ठरला आहे. 


दक्षिण आफ्रिका संघाने मायदेशात खेळताना कसोटीमध्ये चौथ्या डावांत फक्त एकदा 300 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. 2001-02 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात डरबन कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने 335 धावांचा पाठलाग करत विजय मिळवला होता. याची पुनरावृत्ती करण्यास दक्षिण आफ्रिका संघाला अपयश आलं. 


 सेंच्युरियन मैदानात आतापर्यंत कसोटीत 300 धावांचा यशस्वी पाठलाग झालेला नाही. या मैदानावर सर्वात मोठा यशस्वी पाठलाग इंग्लंड संघाने केला होता. 2000 मध्ये इंग्लंड संघाने 251 धावांचा पाठलाग करत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. सेंच्युरियन मैदानात आतापर्यंत 28 कसोटी सामने झाले आहेत. यामध्ये 21 सामने यजमान संघाने जिंकले आहेत. तर तीन वेळा पाहुण्या संघाला विजय मिळवता आला आहे.  चार सामने अनिर्णित राहिले आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारताचा अपवाद वगळता सेंच्युरियन मैदानावर पाहुण्यांना विजय मिळवता आलेला नाही. 


स्कोअरकार्ड -


भारताचा पहिला डाव - सर्वबाद 327 धावा
दक्षिण आफ्रिका पहिला डाव - सर्वबाद 197 धावा
भारताचा दुसरा डाव - सर्वबाद 174 धावा
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव - सर्वबाद 191 धावा
भारताचा 113 धावांनी विजय