IND vs SA T20 Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात पुनरागमनाची संधी मिळालेल्या भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) आणि दीपक चाहर (Deepak Chahar) सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. तिरुअनंतपुरमच्या (Thiruvananthapuram) ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर (Greenfield International Stadium) सुरु असलेल्या या सामन्यात अवघ्या 15 चेंडूत दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ माघारी धाडून दोघंही कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) विश्वासाला खरे उतरले. आशिया चषकात निराशाजनक कामगिरीनंतर अर्शदीपला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेतून वगळण्यात आलं होतं. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत मिळालेल्या संधी त्यानं सोनं केलं.
या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्मानं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथम गोलंदाजीचं आमंत्रण दिलंय. दरम्यान, दीपक चाहर आणि अर्शदीपच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ डगमगताना दिसला. अवघ्या 15 चेंडूत आणि 9 धावांवर दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ माघारी परतला. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील पहिल्या चषकातील अखेरच्या चेंडूवर दीपक चाहरनं कर्णधार टेम्बा बावुमाला माघारी धाडलं. त्यानंतर अर्शदीप सिंहनं आपल्या पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉक, रीली रॉसी आणि डेव्हिड मिलरला बाद केलं. त्यानंतर तिसऱ्याच षटकात दीपक चाहनं ट्रिस्टन स्टब्सला बाद करून दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या डोळ्यात पाणी आणलं.
व्हिडिओ-
संघ-
भारताची प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, अर्शदीप सिंह.
दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग इलेव्हन:
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रॉसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, अॅनरिक नॉर्टजे, तबरेझ शाम्सी.
हे देखील वाचा-