Ind vs SA, 2nd Test Match Highlights : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील कसोटी मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत भारताकडून खराब फलंदाजीचं दर्शन घडलं आहे. तर दुसरीकडे आधी भेदक गोलंदाजी केल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने विश्वासात्मक सुरुवात करत दिवसअखेर केवळ एक विकेट गमावली आहे. 


जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. यावेळी केएल राहुल आणि आर आश्विन सोडता एकाही खेळाडूला खास कामगिरी करता न आल्याने भारताचा डाव 202 धावांवर आटोपला. सामन्याची सुरुवात होताच भारताचे महत्त्वाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. सलामीवीर मयांक 26 धावांवर बाद होताच पुजारा (3) आणि रहाणे (0) लगेच बाद झाले. मग पुढील खेळाडूही पटपट बाद झाले. दरम्यान आश्विनने मात्र धडाकेबाज 46 धावा झळकावल्या ज्यामुळे भारताचा डाव काहीसा सावरला. अखेर बुमराहने दोन चौकार आणि एक षटकार ठोकत 11 चेंडूत 14 धावा केल्या. ज्यामुळे भारताचा 200 धावांचा आकडा पार झाला. 202 धावांवर भारता पहिला डाव संपल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने फलंदाजीची सुरुवात केली. यावेळी चौथ्याच ओव्हरमध्ये शमीने मार्करमला पायचीत करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. पण नंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत एल्गर आणि पीटरसन यांनी क्रिजवर टीकून राहत 35 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. 



राहुल-आश्विनची महत्त्वपूर्ण खेळी


भारताचा पहिला डाव किमान 200 धावांचा आकडा पार करु शकला यामागे केएल राहुल आणि रवीचंद्रन आश्विन या दोघांचा मोठा हात होता. कर्णधार कोहलीने 133 चेंडूत 9 चौकारांसह 50 धावा केल्या. तर दुसरीकडे आश्विनने अखेरच्या फळीत येऊनही धडाकेबाज फलंदाजी करत 50 चेंडूत 6 चौकार ठोकत 46 धावा केल्या. अवघ्या 4 धावांनी त्याचं अर्धशतक हुकलं.


मार्कोची कमाल


आफ्रिकेचा युवा गोलंदाज मार्को जॅन्सन याने नुकताच कसोटी संघात पदार्पण केल्यानंतर या सामन्यातही दमदार कामगिरी केली आहे. त्याने 4 विकेट्स पटकावले आहेत. राहुल, अगरवाल, पंत आणि आश्विन हे चारही महत्त्वाचे विकेट्स मार्कोने टीपले आहेत. याशिवाय रबाडा आणि ऑलिवियर यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आहेत.   


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha