IND vs SA Head To Head Record: भारत- दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय संघानं जोरदार कमबॅक केलंय. अखरेच्या दोन सामन्यात भारतानं उत्कृष्ट कामगिरी करत मालिकेत 2-2 नं बरोबरी साधली. भारत-आफ्रिका यांच्यात आज निर्णायक लढत होणार आहे. आजच्या सामन्यावर विजय मिळवणारा संघ मालिका जिंकेल. त्यामुळे आजचा सामना हा अत्यंत महत्त्वाचा असून या सामन्यात विजयासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची शिकस्त करतील.
भारत- दक्षिण आफ्रिका हेट टू हेड रेकार्ड
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 19 सामने खेळले गेले. त्यापैकी भारतीय संघानं 11 सामने जिंकले आहेत. तर, आठ सामन्यात पराभव पत्कारावा लागलाय. महत्वाचं म्हणजे, भारतीय संघानं मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साठ सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे.
भारताचा संभाव्य संघ-
इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य संघ-
क्विंटन डी कॉक/रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसीव्हेन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेन्रिक क्लासेन (विकेटकीपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, एनरिके नॉर्खिया, तबरेज शम्सी.
हे देखील वाचा-
- IND vs SA, 5th T20 : भारत-दक्षिण आफ्रिका मालिका पावसाच्या हातात? हवामानाची स्थिती चिंता वाढवणारी
- T20 World Cup : 'इंग्लंड दौऱ्यापासून राहुल द्रविड मिशन वर्ल्डकपसाठी लागणार कामाला', सौरव गांगुलीने सांगितला 'मास्टरप्लान'
- Neeraj Chopra : नीरज चोप्राची अप्रतिम कामगिरी सुरुच; फिनलँडमध्ये Kuortane Games मध्ये मिळवलं सुवर्णपदक