IND vs SA 2nd T20: हेन्रिक क्लासेनच्या (Heinrich Klaasen) वादळी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारताला चार विकेट्सनं पराभूत केलं. भारतानं दिलेल्या 149 दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) दक्षिण आफ्रिकेच्या टॉपच्या तीन फलंदाजाला माघारी धाडून सामना टीम इंडियाच्या बाजुनं झुकवला. परंतु, हेन्रिक क्लासेननं तुफानी फलंदाजी करत भारताच्या आशेवर पाणी सोडलं. पाच टी-20 सामन्याच्या मालिकेतील भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरलाय. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं कोणता प्लॅन बनवला, जो अखेरिस यशस्वीही ठरला? याबाबत कर्णधार टेम्बा बावुमानं काय म्हटलंय हे जाणून घेऊयात.
टेम्बा बावुमा काय म्हणाला?
"लक्ष्याचा पाठलाग करणे थोडे अवघड होते. मी खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न करत होतो आणि मी क्लासेनला मोकळेपणानं खेळण्याचा सल्ला दिला. आम्ही थोडे चांगले करू शकलो असतो पण शेवटी निकाल महत्त्वाचा असतो". दरम्यान, भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीचं कौतूक करत बावुमा म्हणाला की, "एका वेळी लक्ष्य कठीण होतं. भुवनेश्वर कुमारनं चांगली गोलंदाजी केली. या सामन्यातून पुढच्या सामन्यासाठी काय घेता येईल ते पाहत आहोत."
मालिका वाचवण्यासाठी भारत खेळणार तिसरा टी-20 सामना
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं 20 षटकात सात विकेट्स गमावून 148 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 18.2 षटकात भारतानं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात हेन्रिक क्लासेननं महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, पाच सामन्याच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताल पराभूत करून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 2-0 नं आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा सामना 14 जूनला खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताला विजय मिळवणं अनिवार्य असणार आहे. तर, तिसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून मालिका खिश्यात घालण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असणार आहे.
हे देखील वाचा-