Ruturaj Gaikwad India vs South Africa, 2nd T20I, Barabati Stadium, Cuttack :  कटक येथे झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा चार विकेटनं पराभव झाला. ऋतुराज गायकवाड, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाड अवघ्या एका धावेवर माघारी परतला. कगिसो रबाडाने ऋतुराज गायकवाडला माघारी धाडले.


ऋतुराज गायकवाड स्वस्तात माघारी परतल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले. सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला. अनेक नेटकऱ्यांनी त्याला लक्ष केलेय. काही जणांनी तर ऋतुराजपेक्षा शुबमन गिल बरा, असं म्हटलेय. ऋतुराज गायकवाड याला पहिल्या सामन्यातही मोठी खेळी करण्यात अपयश आले होते.. पहिल्या सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतर गायकवाड बाद झाला होता. दुसऱ्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची आपेक्षा होती. मात्र, तो एक धाव काढून बाद झाला. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले. 


 
























सामन्यात काय झाले?
हेनरिक क्लासेनच्या (Heinrich Klaasen) वादळी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारताचा चार विकेट्सनं पराभव केला. भारतानं दिलेल्या 149 दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) दक्षिण आफ्रिकेच्या टॉपच्या तीन फलंदाजाला माघारी धाडून सामना टीम इंडियाच्या बाजुनं झुकवला. परंतु, त्यानंतर मैदनात आलेल्या हेनरिक क्लासेननं तुफानी फलंदाजी करत भारताच्या आशेवर पाणी सोडलं. विशेष म्हणजे, पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरलाय.