India vs South Africa: भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यात इंदोरच्या होळकर स्टेडियमवर तिसरा आणि अखेरच्या सामना खेळला जातोय. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारतानं आधीच मालिका खिशात घातलीय. ज्यामुळं तिसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुलला विश्रांती देण्यात आलीय. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. त्यानंतर रिले रोसोचं शतक आणि क्विंटन डी कॉकची वादळी अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 20 षटकात 3 विकेट्स गमावून भारतासमोर 228 धावांचं लक्ष्य ठेवलं. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या डावातील अखेरच्या षटकात वेगवान गोलंदाज दीपक चाहरनं मोहम्मद सिराजला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 20 व्या षटकात कर्णधार रोहित शर्मानं दीपक चहरकडं चेंडू सोपवला. दीपक चहरच्या या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी 24 धावा कुटल्या. मोहम्मद सिराजच्या एका चुकीमुळं दीपक चहरच्या खात्यात अतिरिक्त सहा धावा जोडल्या. दरम्यान, अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर डेव्हिड मिलरनं डीप स्केअर लेगच्या दिशेनं उंच फटका मारला. त्यावेळी मोहम्मद सिराजनं झेल पकडला, पण त्याचा पाय सीमारेषेला लागल्यानं पंचांनी हा षटकार दिला. ज्यानंतर दीपक चाहरनं भरमैदानात मोहम्मद सिराजला शिवीगाळ केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय
व्हिडिओ-
रिले रोसो- क्विंटन डी कॉकच्या वादळी खेळीसमोर भारतीय गोलंदाजांचं लोटांगण
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाचव्या षटकात 30 धावांवर पहिली विकेट गमावली. यानंतर क्विंटन डी कॉक आणि रिले रुसो यांच्यात अत्यंत महत्त्वाची 90 धावांची भागीदारी झाली. डी कॉकनं 43 चेंडूत 68 धावांची खेळी केली. ज्यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. परंतु, 12 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर डी कॉक रनआऊट झाला. डीकॉकनं आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. या खेळीदरम्यान डी कॉकनं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील 2000 धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फलंदाज ठरला. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खातंही उघडू न शकलेल्या रोसोनं भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.अवघ्या 48 चेंडूत त्यानं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं शतकं झळकावलं.ज्यात 7 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे.
भारताची प्लेईंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग इलेव्हन:
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
हे देखील वाचा-