South Africa tour of India: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA 4th T20) यांच्यातील चौथ्या टी-20 मालिकेत दमदार कमगिरी करणारा दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला. या सामन्यात त्यानं आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक झळकावलंय. दरम्यान, त्याच्या 27 चेंडूत 55 धावांच्या धडाकेबाज खेळीमुळं भारतीय संघ सन्मानजनक धावसंख्या गाठू शकला. तब्बल 16 वर्षानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक झळकावल्यानंतर दिनेश कार्तिक नेमकी काय प्रतिक्रिया दिली? हे जाणून घेऊयात.


दिनेश कार्तिक काय म्हणला?
"मी या सेटअपमध्ये स्वत:ला खूप सुरक्षित मानतो. शेवटच्या सामन्यात माझ्यासाठी काही गोष्टी चांगल्या ठरल्या नाहीत.  पण जेव्हा मी ड्रेसिंग रूममध्ये परतलो तेव्हा मी स्वतःला सुरक्षित समजले. मी आता चांगला विचार करू शकतो. हे सर्व नियोजन आणि अनुभवातून आले आहे. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होते. आमचे सलामीवीर धावा करू शकले नाहीत. जेव्हा मी क्रीजवर पोहोचलो तेव्हा हार्दिकनं मला क्रीजवर थोडा वेळ घालवण्याचा सल्ला दिला.काही निर्णय आमच्यासाठी योग्य ठरले.यादरम्यान कार्तिकनं प्रशिक्षक राहुल द्रविडचाही उल्लेख केला. 'फलंदाज आणि गोलंदाजांनी काय करायला हवे? यावर राहुल द्रविडचे लक्ष असते. त्याला निकालाची फारशी चिंता नसते. सध्या ड्रेसिंग रूमचं वातावरण चांगलेच आहे. वातावरणात स्पष्टता असणे एखाद्या खेळाडूला पुढे जाण्यास खूप मदत करते."


तब्बल 16 वर्षानंतर दिनेश कार्तिकचं टी-20 मध्ये अर्धशतक
कार्तिक भारताच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याचा (1 डिसेंबर 2006) भाग होता. त्यानं जोहान्सबर्गमध्येच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ज्यामध्ये त्यानं 28 चेंडूत नाबाद 31 धावांची खेळी केली होती. पण 16 वर्षांनंतर कार्तिकने पहिले आणि सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. त्याने अवघ्या 26 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. कार्तिकनं 27 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 55 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 200 पेक्षा जास्त होता.


आयपीएल 2022 मध्ये दमदार कामगिरी 
दिनेश कार्तिकने 2022 आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. आयपीएलमधील विस्फोटक फंलदाजीच्या जोरावर कार्तिकनं पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन केलं. आयपीएल 2022 मध्ये कार्तिकनं 184 च्या स्ट्राईक रेटने 330 धावा केल्या. ज्यामुळं भारतीय संघात त्याची निवड करण्यात आली. 


हे देखील वाचा-