Ind vs SA, 3rd Test Highlights: भारत आणि दक्षिण आफ्रीका (Ind vs SA) यांच्यीतील कसोटी मालिकेतील (Test Series) तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना आफ्रिकेच्या केपटाउन येथे सध्या सुरु होत आहे. तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 च्या बरोबरीत असून हा तिसरा आणि निर्णायक सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकेल. पण या महत्त्वाच्या कसोटीत भारताची सुरुवात मात्र डळमळीत झाली आहे. पहिल्याच दिवशी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचे महत्त्वाचे फलंदाज फार कमी धावांमध्ये तंबूत परतले आहेत. भारताचा अनुभवी पुजाराने 43 धावा केल्या असून अगरवाल, राहुल आणि रहाणे हे फार स्वस्तात माघारी परतले आहेत.
सध्या क्रिजवर कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हे दोघे आहेत. 45 षटकानंतर भारताचा स्कोर 124 वर 4 बाद असा आहे. दरम्यान कर्णधार विराट अतिशय संयमी खेळीचं दर्शन घढवत असल्याने त्याच्यावर आज साऱ्यांच्याच आशा आहेत. तसंच कसोटी सामन्यात पहिल्या डावात केलेल्या धावा अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असल्याने भारताने एक मोठी धावसंख्या निर्माण करणं फार गरजेचं आहे.
भारताला इतिहास रचण्याची संधी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 च्या बरोबरीत असून यामुळे भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे. कारण ही कसोटी जिंकताच भारत मालिकाही जिंकेल आणि दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा मान भारताला मिळेल. पण केपटाऊनमधला हा विजय भारताला सोपा नसून आतापर्यंत या मैदानात खेळलेल्या पाच पैकी पाच सामन्यात भारताला एकदाही विजय मिळवता आलेला नाही.
हे देखील वाचा-
- Washington Sundar Covid Positive: युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर कोरोनाबाधित, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय संघात खेळण्यावर प्रश्नचिन्ह
- Chris Morris Retires: दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर क्रिस मॉरिस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
- IPL Auction Update: यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दीक पंड्या कर्णधार? बंगळुरू, अहमदाबाद संघाची धुरा सांभाळणार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha