IND vs SA 3rd T20I Playing 11: अखेरच्या आणि निर्णायक टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. आफ्रिकेच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. 


भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यामध्ये आज अखेरचा टी 20 सामना होत आहे. पहिला सामना पावसामुळे धुतला गेला होता. तर दुसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (IND vs SA) विजय मिळवला. त्यामुळे आता तिसरा सामना कोण जिंकणार ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. आफ्रिका अखेरचा टी 20 सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरले, तर टीम इंडिया बरोबरी करण्याच्या इराद्याने खेळणार आहे. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. दुसऱ्या सामन्यातील संघ कायम ठेवण्यात आलाय. 


दक्षिण आफ्रिकेच्या प्लेइंग-11 मध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. मार्को यान्सन आणि जेराल्ड कोएत्झी यांना कसोटी मालिकेच्या तयारीसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी नांद्रे बर्गर आणि केशव महाराज दाखल झाले आहेत. दुसरीकडे, भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


भारतीय संघाची प्लेईंग 11 


यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकिपर), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार 


दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग 11 - 
रीजा हेंड्रिक्स, मैथ्यू ब्रीट्जके, एडेन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर,  एंडिले फेहलुकवायो, लिज़ाद विलियम्स, तबरेज शम्सी, नंदरे बर्गर, डोनोवन फरेरा, केशव महाराज



कधी होणार सामना ?


भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यादरम्यान तिसरा टी 20 सामना आज, 14 डिसेंबर रोजी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार, रात्री 8.30 वाजता होणार आहे. 


कुठे पाहाल सामना ?


भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील तिसरा टी 20 सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येईल. मोबाईलवरुन डिज्नी प्लस हॉटस्टारवर मोफत सामना पाहता येईल. 


 भारत आणि दक्षिण आफ्रिका हेड टू हेड, कोण वरचढं? 


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आतापर्यंत 26 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यामध्ये 13 सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली आहे. तर दक्षिण आफ्रिकेने 11 सामने जिंकले आहेत. दोन सामन्याचा निकाल लागला नाही.