India playing XI vs SA for 1st T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्याची वनडे मालिका संपली असून टीम इंडियाने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे. आता लक्ष आहे पाच सामन्यांच्या टी20 मालिकेकडे, ज्याची सुरुवात 9 डिसेंबरपासून होत आहे. मालिकेतील पहिला टी20 सामना कटक येथील बाराबती स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल.
धमाकेदार सुरुवात करण्यावर टीम इंडियाचं लक्ष सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मालिकेची सुरुवात विजयाने करण्याच्या प्रयत्नात असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेआधी भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवत मोठी कामगिरी केली होती आणि तीच गती टीम इंडियाला पुढेही कायम राखायची आहे.
शुभमन गिल पूर्णपणे फिट
टी20 संघात निवड झाल्यानंतर शुभमन गिल पहिल्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत संशय होता. मात्र तिसऱ्या वनडेनंतर हेड कोच गौतम गंभीर यांनी गिल पूर्णपणे फिट असल्याचे स्पष्ट केले. गिल खेळल्यास तो अभिषेक शर्मासह सलामीला उतरण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाचा संभाव्य फलंदाजी क्रम
सलामीनंतर सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर अशी फलंदाजीची रचना असू शकते. विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन किंवा जितेश शर्मा यापैकी कोणाला संधी मिळू शकते. भारतीय संघाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे की संघात सध्या दर्जेदार फिरकी आणि वेगवान गोलंदाजी करणारे ऑलराउंडर आहेत, ज्यामुळे संघाला उत्तम संतुलन मिळाले आहे.
गोलंदाजीचा किल्ला मजबूत
फिरकी विभागात कुलदीप यादव किंवा वरुण चक्रवर्ती यापैकी एकाला पहिल्या सामन्यात संधी मिळू शकते. अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरही फिरकीचे पर्याय उपलब्ध करून देतील. वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराह पुन्हा संघात परतणार असून, त्याला हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांची साथ मिळण्याची शक्यता आहे. एकूणच पाहता, संतुलित संघरचनेसोबत भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेत प्रभावी कामगिरी करण्यास पूर्णपणे सज्ज आहे.
पहिल्या T20I साठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन/जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव/वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
हे ही वाचा -