India vs Pakistan, World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकात होणाऱ्या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमीचं लक्ष लागले आहे.  या सामन्याकडे भारत आणि पाकिस्तानसह (IND vs PAK) जगभरातील क्रीडा चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. या सामन्यासाठी भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ अहमदाबादमध्ये (Narendra Modi Stadium)  दाखल झाले आहेत.  14 ऑक्टोबर रोजी हा सामना रंगणार आहे.  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणारा सामन्याला फक्त 48 तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. विश्वचषक विजयाच्या दावेदार असणाऱ्या दोन संघातील (IND vs PAK) लढतीकडे सर्व क्रीडा चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. हा सामना सर्वांना मोफत पाहता येणार आहे. याबाबत सर्व माहिती जाणून घेऊयात...  


सामन्याची तारीख आणि वेळ : शनिवार, 14 ऑक्टोबर, 2023, दुपारी दोन वाजता


सामन्याचे ठिकाण आणि स्टेडियम: अहमदाबाद, नरेंद्र मोदी स्टेडियम


टिव्हीवर प्रेक्षपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क


लाइव्ह स्ट्रीमिंग: डिज्नी प्लस हॉटस्टार


टिव्हीवर कुठे पाहाल सामना ?


भारत-पाकिस्तान यांच्यात होणारा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी अर्धातास नाणेफेक होईल. टिव्हीवर  स्टार स्पोर्ट्स चॅनलवर सामना पाहता येईल.  स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी सह इतर भाषांमध्येही सामन्याचा आनंद घेता येईल. 


फुकटात कुठे पाहाल सामना ?


भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणारा महामुकाबला मोबईलवरही लाईव्ह पाहता येईल. डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर हा सामना मोफत पाहता येईल. त्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन चार्ज लागणार नाही. फ्रीमध्ये या सामन्याचा आनंद घेता येईल. तुम्हाला फक्त लॉगइन करावे लागले. त्याशिवाय एबीपी माझाच्या संकेतस्थळावर सामन्यासंदर्भात सर्व माहिती वाचता येईल. 


मोबाइलवर कुठे पाहाल सामना ?


डिज्नी प्लस हॉटस्टार विश्वचषकाचे सर्व सामने मोफत पाहता येतील. मोबाइलवर सामना पाहण्यासाठी फक्त तुम्हाला हॉटस्टार अॅप डाउनलोड करावे लागेल. 


रेडियोवर कुठे ऐकाल लाईव्ह कॉमेंट्री ?


विश्वचषकातील सामन्याचे लाई्ह कॉमेंट्री अथवा समालोचन ऐकायचं असेल तर तुम्हाला ऑल इंडिया रेडियोच्या डिजिटल चॅनल - इंडिया: प्रसार भारतीवर जावे लागेल. त्याशिवाय आयसीसीच्या ऑफिशियल डिजिटल ऑडियो पार्टनर डिजिटल 2 स्पोर्ट्स (Digital 2 Sports) वरही समालोचन ऐकू शकता. 


विश्वचषकाच्या बातम्या कुठे वाचाल - 
विश्वचषकाच्या बातम्या अथवा स्कोअरकार्ड पाहण्यासाठी तुम्हाला आयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा एबीपी माझाच्या https://marathi.abplive.com/ संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.