Who Is Sameer Minhas Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: पाकिस्तानचा युवा खेळाडू समीर मिन्हास (Sameer Minhas) 2025 च्या अंडर-19 आशिया कपमध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे चर्चेत आला आहे. आशिया कपच्या स्पर्धेतील मलेशियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात समीर मिन्हासने 177 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर काल झालेल्या भारतविरुद्धच्या अंतिम सामन्यात देखील समीर मिन्हासने 172 धावा केल्या. समीर मिन्हासच्या याच खेळीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. (Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final)

Continues below advertisement

अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात (U19 Asia Cup 2025 Final), समीर मिन्हासने फक्त 133 चेंडूत 17 चौकार आणि 9 षटकार मारून 172 धावा केल्या. समीरच्या स्फोटक फलंदाजीमुळे, पाकिस्तानने जेतेपदाच्या सामन्यात 50 षटकांत 7 बाद 347 धावा केल्या. समीरने फक्त 71 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. समीर 2025 च्या अंडर-19 आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी, समीर मिन्हासने बांगलादेशविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही नाबाद 69 धावांची दमदार खेळी देखील केली होती.

कोण आहे समीर मिन्हास?- (Who Is Sameer Minhas)

समीर मिन्हासचा जन्म 2 डिसेंबर 2006 रोजी पाकिस्तानमधील मुल्तान येथे झाला. समीर मिन्हास फलंदाजीसह लेग स्पिन गोलंदाजीही करतो. समीर मिन्हास अराफत मिन्हासचा धाकटा भाऊ आहे. अराफत मिन्हासने पाकिस्तानकडून चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Continues below advertisement

अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताचा 191 धावांनी पराभव- (Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final)

अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा 191 धावांनी पराभव केला. जेतेपदाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने समीर मिन्हासच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर 347 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा संघ फक्त 156 धावांवर आटोपला. पाकिस्तानने दिलेल्या 348 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताने तिसऱ्याच षटकांत 32 धावांवर पहिली विकेट गमावली. आयुष म्हात्रे सात चेंडूत दोन धावा करून बाद झाला.त्यानंतर आरोन जॉर्ज नऊ चेंडूत 16 धावा करून बाद झाला. यापाठोपाठ वैभव सूर्यवंशी 10 चेंडूत 26 धावा करून बाद झाला, ज्यामध्ये एक चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. भारताच्या एकाही आघाडीच्या फलंदाजाने सातत्यपूर्ण फलंदाजी केली नाही. जलद धावांचा पाठलाग करताना सर्व बाद झाले. वेदांत त्रिवेदी 14 चेंडूत 9, अभिज्ञान कुंडू 20 चेंडूत 13, कनिष्क चौहान 23 चेंडूत 9 आणि खिलन पटेल 23 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. हेनिल पटेलनंतर दीपेश देवेंद्रनने 36 धावा केल्या.

संबंधित बातमी:

Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: पाकिस्तानकडून धुरंधरच्या गाण्यावर सेलिब्रेशन; टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर नको नको ते केलं, नेमकं काय घडलं?, VIDEO

Mohsin Naqvi Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: मोहसीन नक्वीला टीम इंडिया पुन्हा नडली; आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा राडा, नेमकं काय घडलं?