Vaibhav Suryavanshi Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: अंडर-19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा (Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final) पराभव करत जेतेपद पटकावले. 2025 च्या 19 वर्षांखालील आशिया कपच्या (U19 Asia Cup 2025) अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा 191 धावांनी पराभव केला. अंतिम सामन्यात पाकिस्तानने 347 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने केवळ 156 धावा केल्या. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात अनेक वादा पाहायला मिळाले. भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये अनेकदा बाचाबाची देखील झाली. (vaibhav suryavanshi ind vs pak)

Continues below advertisement

पाकिस्तानने दिलेल्या 347 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. भारताने अवघ्या दोन षटकांत 30 धावा ठोकल्या. या सामन्यात वैभव सूर्यवंशी (vaibhav suryavanshi) जेव्हा झेलबाद झाला. त्यावेळी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज अली राजाने जोरदार सेलिब्रेशन केले. तसेच अली राजा वैभव सूर्यवंशीकडे बघत काहीतरी बोलत राहिला. यावेळी वैभव सूर्यवंशीनेही प्रत्युत्तर दिलं. 

नेमकं काय घडलं? (vaibhav suryavanshi controversy)

अली राजाच्या गोलंदाजीवर विकेटकीपर हमजा झहूरने त्याचा झेल घेतला तेव्हा वैभव सूर्यवंशीने 10 चेंडूत 26 धावा केल्या होत्या. बाद झाल्यानंतर वैभव शांतपणे माघारी परतत होता. परंतु अली राजा उत्साहाच्या भरात काहीतरी वैभव सूर्यवंशीला बोलला. यावर प्रतिक्रिया देताना वैभव सूर्यवंशीने हातवारे करत तुझी जागा माझ्या पायालाखी आहे, असं दर्शवले. वैभव सूर्यवंशीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशी प्लॉप- (Ind vs Pak Vaibhav Suryavanshi)

वैभव सूर्यवंशीने अंडर-19 आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईविरुद्ध 171 धावा केल्या. त्या डावात वैभव सूर्यवंशीने अनेक विक्रम मोडले. तसेच मलेशियाविरुद्धही वैभवने अर्धशतकही झळकावले. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला त्याच्याकडून मोठी खेळी अपेक्षित होती, परंतु 10 चेंडूत 26 धावा करून बाद करत वैभव बाद झाला. 

संबंधित बातमी:

Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: पाकिस्तानकडून धुरंधरच्या गाण्यावर सेलिब्रेशन; टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर नको नको ते केलं, नेमकं काय घडलं?, VIDEO

Mohsin Naqvi Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: मोहसीन नक्वीला टीम इंडिया पुन्हा नडली; आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा राडा, नेमकं काय घडलं?