IND vs PAK Asia Cup 2023 LIVE Score: पाकिस्तानविरोधात टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. शाहिन आफ्रिदीने विराट कोहली आणि रोहित शर्मा या अनुभवी फलंदाजांना एकापाठोपाठ एक तंबूत धाडत भारतीयांचा हिरमोड केला. शाहिन आफिर्दीच्या भेदक माऱ्यापुढे विराट आणि रोहितच्या दांड्या गुल झाल्या. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. वारंवार पावसाचा व्यत्यय येत असतानाच शाहिन आफ्रिदीने भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना तंबूत धाडले. 


रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. दोघेही संयमी फलंदाजी करत होते. पाचवे षटक सुरु झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शाहिन आफ्रिदी याने रोहित शर्माला त्रिफाळाचीत बाद करत भारता मोठा धक्का दिला. पहिल्या धक्क्यातून टीम इंडिया सावरणार त्याआधीच शाहिन याने दुसरा धक्का दिला. शाहिन आफ्रिदीने विराट कोहली यालाही त्रिफाळाचीत बाद करत 140 कोटी भारतीयांचा हिरमोड केला. 




रोहित शर्मा याने 22 चेंडूत 11 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन चौकार लगावले. तर विराट कोहली याने एका चौकाराच्या मदतीने चार धावा केल्या. रोहित आणि विराट कोहली यांना मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना शाहिन आफ्रिदी याने तंबूचा रस्ता दाखवला. 


रोहित शर्मा आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर याने डावाची सुत्रे हातात घेतली. अय्यर याने दोन खणखणीत चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. श्रेयस अय्यर आणि गिल भारताचा डाव सावरतील, असे वाटत होते. पण हॅरिस रौफ याने श्रेयस अयय्र याला फखर जमान याच्याकरवी झेलबाद करत भारताला तिसरा धक्का दिला. श्रेयस अय्यर याने 9 चेंडूत दोन चौकाराच्या मदतीने 14 धावांचे योगदान दिले. 






एकीकडे विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला युवा शुभमन गिल संयमी फलंदाजी करत आहे. शुभमन गिल 24 चेंडूत सहा धावांवर नाबाद आहे. गिल याने 10 चेंडूनंतरही खाते उघडता आले नाही. पण आघाडीचे फलंदाज तंबूत परतत असताना गिल संयमी फलंदाजी करत आहे. शुभमन गिल सहा चेंडूत दोन धावांवर खेळत आहे. गिल आणि इशान किशन या युवा फलंदाजांच्या हातात भारतीय संघाची धुरा आहे. दोन फलंदाज कशी कामिगिरी करतात त्यावर भारतीय संघाची धावसंख्या अवलंबून आहे. 


दुसऱ्यांदा पावसामुळे सामना थांबला तेव्हा भारताने तीन बाद 5 1 धावा केल्या आहेत. गिल 6 तर इशान किशन 6 धावांवर खेळत आहे. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदी याने 5 षटकात 15 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या आहेत. शाहिन आफ्रिदी याने दोन षटके निर्धाव फेकली आहेत. तर हॅरिस रौफ याने 2.2 षटकात 18 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली आहे. नसीम शाह याला विकेट मिळाली नाही, पण त्याने भेदक मारा केला आहे. नसीम शाह याने 4 षटकात फक्त 15 धावा खर्च केल्या आहेत.