मुंबई : आज भारत आणि न्यूझिलंडमध्ये सामना रंगणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दमदार कामगिरी केली असून पहिल्यांदाच भारत न्यूझिलंडसोबत लढत देणार आहे.





भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे न्यूझिलंड विरूद्धचा टी-20 आणि वनडे सीरीज खेळू शकणार नाही. विकेटकिपर-फलंदाज असणारा संजू सॅमसन याला शिखर धवनऐवजी संघात स्थान देण्यात आलं आहे. याआधी भारतीय संघ 2019च्या सुरुवातीला न्यूझिलंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारतीय संघाने 4-1च्या फरकाने ही एकदिवसीय मालिका खिशात घातली होती. परंतु, टी-20 सीरिजमध्ये 1-2 च्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता.





दरम्यान, भारत, न्यूझीलंड या दोन्ही संघांना प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींची तीव्र उणीव भासणार आहे. भारताला शिखर धवन, दीपक चहर, हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार यांच्याशिवाय खेळावे लागणार आहेत. सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणून गणना होणारा ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री आणि लॉकी फग्र्युसन दुखापतीमुळे भारताविरुद्धची मालिका खेळू शकणार नाहीत. त्यामुळे भारत विरूद्ध न्यूझिलंडची लढतीत याचा भारतीय संघाला फायदा होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान हा सामना ऑकलॅन्ड येथे खेळवण्यात येणार असून सामना भारतीय वेळेनुसार 12 वाजून 20 मिनिटांनी सुरू होणार आहे.


असे आहेत दोन्ही संघ :


टी-20 सीरिजसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, वॉशिग्टंन सुंदर.


टी-20 सीरिजसाठी न्यूझिलंड संघ : केन विलियम्सन (कर्णधार) , मार्टिन गुप्तिल, रॉस टेलर, स्कॉट कजेलेजिन, कॉलिन मुन्रो, कोलिन डे ग्रॅन्डहोमे, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनेर, टिम सीफर्ट , हामिश बेनेट, ईश सोढी, टिम साउदी, ब्लेयर टिकनेर.


संबंधित बातम्या : 


खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल, युवा खेळाडूंकडून 78 सुवर्णांसह 256 पदकांची लयलूट


मुंबईच्या सरफराजचं रणजी करंडकात ऐतिहासिक त्रिशतक, यूपीवर निर्णायक आघाडी, तर महाराष्ट्राचा आसामवर सनसनाटी विजय


INDvsAUS | टीम इंडियाचा मालिका विजय, ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, रोहित, विराटची शानदार फलंदाजी