India vs New Zealand ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर सुरु असून भारतानं एक मोठं लक्ष्य उभारलं आहे. भारतीय सलामीवीरांनी द्वीशतकी भागिदारी उभारत दोघांनी शतकं ठोकली आहेत. शुभमन गिलनं 112 आणि रोहित शर्मानं 101 धावा ठोकल्या आहेत. याशिवाय हार्दिक पांड्यानंही तुफानी फटकेबाजी करत 54 धावांची दमदार खेळी केली. भारतानं 50 षटकांत 385 धावा केल्या असून न्यूझीलंडला 386 धावांचं लक्ष्य मिळालं आहे. 


सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत न्यूझीलंडनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं मागील काही काळात प्रथम फलंदाजी करत दमदार फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारल्याचं दिसून आलं आहे. आजही भारतानं तुफान फलंदाजी करत तब्बल 386 धावांची मोठी धावसंख्या उभारली आहे. सर्वात आधी सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सुरुवातीपासूनच स्फोटक खेळी सुरु ठेवली. दोघांनी आपआपली शतकं पूर्ण केली, ज्यामुळे भारताची धावसंख्याही 200 पार गेली. रोहित 101 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर काही वेळात शुभमनही 112 धावा करुन तंबूत परतला. विराटनं 36 धावांची खेळी केली पण तोही तंबूत परतला. त्यानंतर हार्दिक पांड्यानं 54 धावांची स्फोटक खेळी केली, ज्यामुळे भारताची धावसंख्या आणखी मजबूत झाली. 385 धावा भारताने स्कोरबोर्डवर लावल्या असून आता न्यूझीलंडला 386 धावा 50 षटकांत करायच्या आहेत.


रोहितनं केला खास रेकॉर्ड


न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात आणखी एक अप्रतिम रेकॉर्ड कर्णधार रोहितनं नावावर केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. यादरम्यान त्याने श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्याचा विक्रम मोडला. सामन्यापूर्वी रोहितला जयसूर्याचा विक्रम मोडण्यासाठी चार षटकारांची गरज होती. डावाची सुरुवात करण्यासाठी आल्याआल्याच हिटमॅनने जयसूर्याला मागे टाकले. जयसूर्याने एकदिवसीय कारकिर्दीत 270 षटकार ठोकले होते. त्याच वेळी, रोहितने आता वनडे क्रिकेटमध्ये 273 षटकार ठोकले आहेत. इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात रोहितने शतक ठोकलं असून बऱ्याच काळानंतर त्याने सेन्चूरी ठोकली आहे. रोहित 85 चेंडूत 101 धावा केल्या. यावेळी त्याने 6 षटकार आणि 9 चौकार ठोकले. 


कसे आहेत दोन्ही संघ?


भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, युजवेंद्र चहल


न्यूझीलंड - फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सॅंटनर, जॅकॉब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर


हे देखील वाचा-