IND vs NZ Champions Trophy 2025 Final : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड 9 मार्च रोजी दुबईमध्ये आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघाला 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती. गेल्या वेळी 2017 मध्ये पाकिस्तानने टीम इंडियाचे सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंग केले होते, पण यावेळी टीम इंडिया कोणत्याही किंमतीत जेतेपदावर कब्जा करू इच्छिते. पण, टीम इंडियासाठी हे सोपे नसेल कारण आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंड नेहमीच भारतासाठी कठीण आव्हान दिले आहे. आयसीसीच्या बाद फेरीत न्यूझीलंडने भारताविरुद्ध चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. या रेकॉर्डकडे पाहता, टीम इंडिया अंतिम सामन्यात कोणत्याही प्रकारची कमी करू इच्छित नाही.
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये काही उत्तम खेळाडू आहेत जे उत्तम फॉर्ममध्ये आहेत आणि अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये तीव्र स्पर्धा अपेक्षित आहे. म्हणूनच ड्रीम-11 संघाची निवड खूप विचारपूर्वक करावी लागते. ड्रीम-11 संघात कोणत्या 11 खेळाडूंचा समावेश करता येईल ते जाणून घेऊया....
भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनल सामन्याची A टू Z माहिती
तारीख : 9 मार्च 2025
दिवस : रविवार
वेळ : दुपारी 2:30 (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
स्थळ : दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई
कुठे पाहायचा : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
लाईव्ह स्ट्रीमिंग : जिओहॉटस्टार
भारत विरुद्ध न्यूझीलंड ड्रीम-11 अंदाज
कर्णधार : विराट कोहली
उपकर्णधार : रचिन रवींद्र
विकेटकीपर: केएल राहुल
फलंदाज : शुभमन गिल, केन विल्यमसन
अष्टपैलू : रवींद्र जडेजा, मिशेल सँटनर, ग्लेन फिलिप्स
गोलंदाज : मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, विल ओ'रोर्क.
----------------------------------------------------
कर्णधार: रचिन रवींद्र
उपकर्णधार : विराट कोहली
विकेटकीपर : केएल राहुल
फलंदाज : शुभमन गिल, केन विल्यमसन
अष्टपैलू : रवींद्र जडेजा, मिशेल सँटनर, ग्लेन फिलिप्स
गोलंदाज : मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, विल ओ'रोर्क.
नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात. ही बातमी केवळ माहिती म्हणून देत आहोत, यातून कोणताही दावा करत नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी दोन्ही संघ :
न्यूझीलंड क्रिकेट संघ : विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओ'रोर्क, जेकब डफी, डेव्हॉन कॉनवे, मार्क चॅपमन, नाथन स्मिथ
भारतीय क्रिकेट संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.