Best Match Bowling Figures at Wankhede: भारत आणि न्यूझीलंड (IND Vs NZ, 2nd Test) यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवला जात आहे. आज या कसोटीचा तिसरा दिवस असून भारतानं न्यूझीलंडसमोर 540 धावांचे लक्ष्य ठेवलं. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलनं कसोटी क्रिकेटच्या एका डावात 10 बळी घेऊन इतिहास रचलाय. याचबरोबर त्यानं वानखेडे मैदानावर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. 


कसोटीच्या एका डावात दहा बळी घेण्याचा विक्रम फिरकी गोलंदाजांच्याच नावावर आहे. पण पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजानं घराबाहेर हा पराक्रम केलाय. यापूर्वी, अनिल कुंबळे आणि जीम लेकर यांनी घरच्या मैदानावर हा पराक्रम केलाय. 


वानखेडेवरील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी


वानखेडे मैदानावर एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत एजाज अव्वल स्थानी आहे. सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात एजाजनं 225 धावात 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर 13 विकेट्स घेणारे आयन बोथम दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी भारताविरुद्ध 1980 साली ही कामगिरी केलीय. भारताचा फिरकीपटू आर. आश्विन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 2016 साली इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात 167 धावा देऊन 12 विकेट्स घेतल्या.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-