IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारताचं वर्चस्व दिसत आहे. आज या कसोटीचा तिसरा दिवस असून भारतानं आज दुसऱ्या डावात बिनबाद 69 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली.  काल न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलनं जादुई गोलंदाजी भारताच्या दहाही खेळाडूंना माघारी धाडून विश्वविक्रम रचला. भारतीय गोलंदाजांनीही न्यूझीलंडला जशासतसं प्रत्युत्तर दिलं. भारतीय गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचा डाव 62 धावांवर ढेपाळला. ज्यामुळं भारताला मोठ्या धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघानं दुसऱ्या सत्रामध्ये 539 धावांचा डोंगर उभा करून डाव घोषित केलाय.


एजाज पटेलच्या विश्वविक्रमाच्या बळावर न्यूझीलंड संघानं भारताला पहिल्या डावात 325 धावांवर रोखलं. एजाज पटेलनं संपूर्ण भारतीय संघाला बाद करत विश्वविक्रम रचला. मात्र, न्यूझीलंडला हा आनंद फार काळ साजरा करता आला नाही. कारण, भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत न्यूझीलंड संघाला अवघ्या 62 धावांत गुंडाळलं. कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत खेळणारा न्यूझीलंडचा संघ अतिशय दुबळा दिसत होता. 325 धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. 


सिराजनं आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद करत न्यूझीलंडचं कंबरडं मोडलं. तर अश्विननं चार फलंदाजांना बाद करत न्यूझीलंडची अवस्था अधिकच बिकट केली. अक्षर पटेलनं दोन तर जयंत यादव यांनं एक विकेट्स घेतला. न्यूझीलंडकडून एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फंलदाजी करता आली नाही. कर्णधार टॉम लेथम, रॉस टेलर, डॅरेल मिचेल, विल यंग आणि हेन्री निकोलस यासारख्या फलंदाजांना आपल्या लौकिकास खेळी करण्यात अपयश आलं. न्यूझीलंडकडून फक्त दोन फलंदाजांना दहा धावांचा टप्पा ओलांडता आला. जेमिसननं सर्वाधिक 17 धावा केल्या तर, लेथमला दहा धावा करता आल्या. यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा ओलांडता आला नाही.


भारताने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात 276/7 वर आपला दुसरा डाव घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर 540 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून मयंक अग्रवाल (62) यांनी सर्वाधिक धावा केल्या तर एजाज पटेलने 14/225 अशी करिअरची सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली. या सामन्यावर भारतावर वर्चस्व दिसत आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका खिशात घालणार आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-