India vs New Zealand, 1st Inning : न्यूझीलंडच्या माऊंट मॉन्गनुई येथील बे ओवल क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) सामना सुरु असून या सामन्यात सूर्यकुमार यादव (suyakumar Yadav) नावाचं वादळ आल्याचं पाहायला मिळालं. अवघ्या 49 चेंडूत शतक ठोकणाऱ्या सूर्याने सामन्यात केलेल्या नाबाद 111 धावांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर 192 धावांचं आव्हान ठेवलं आहे. याशिवाय अखेरच्या षटकात भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या टीम साऊदीनं (Tim Southee) हॅट्रीक घेतल्याचं पाहायला मिळालं.  






मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यावर आज दुसरा सामना खेळवला जात आहे. सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी निवडली. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात ठिकठाक झाली. ईशान किशन (Ishan Kishan) चांगल्या लयीत दिसत होता. पण पंत अगदी स्वस्तात 13 चेंडूत 6 धावा करुन बाद झाला. मग सूर्यकुमार फलंदाजीला आला आणि त्यानेही फटकेबाजी सुरु केली. तितक्यात ईशान किशन 36 धावा करुन बाद झाला. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि हार्दिक (Hardik Pandya) यांनीही प्रत्येकी 13 धावा केल्या. पण सूर्युकमार मात्र तोवर तुफान फॉर्मात आला होता. तो चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत होता. 49 चेंडूत त्याने शतक पूर्ण केलं. भारत 200 पार जाईल असं वाटत होतं. पण अखेरच्या षटकात भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या टीम साऊदीनं हॅट्रीक घेतली. ज्यामुळे भारत 191 धावा करु शकला आता 192 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी न्यूझीलंड मैदानात आली आहे.


कसे आहेत दोन्ही संघ?


भारतीय संघ -
ईशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुडा, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज.


न्यूझीलंडचा संघ -


फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी.