IND vs NZ, Playing 11 : प्रत्येकी तीन सामन्यांची टी-20 आणि वन डे मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ न्यूझीलंड (India tour of New Zealand) दौऱ्यावर गेला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना वेलिंग्टनच्या स्काय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार होता. पण पावसामुळं हा सामना रद्द करण्यात आला. ज्यानंतर आता मालिकेतील दुसरा सामना आज (20 नोव्हेंबर) माउंट मॉन्गनुई स्टेडियमवर खेळवला जात असून नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी निवडली आहे. मालिकेतील हा पहिलाच सामना असल्याने कोणा-कोणाला संधी मिळणार हे प्रश्नचिन्ह होतं, ज्याचं उत्तर अखेर मिळालं आहे.


भारतीय संघाचा विचार करता आज सलामीला थेट ऋषभ पंत येत आहे. जोडीला ईशान किशन असणार आहे. शुभमन गिलला संधी मिळेल असं वाटत होतं पण त्याला संधी मिळालेली नाैही. इनफॉर्म सूर्याने विराटची जागा घेतली असून संजूला आज संधी मिळालेली नाही. श्रेयस अय्यर, पांड्या, दीपक आणि वॉशिंग्टन हे मधल्या फळीत असून गोलंदाजीची धुरा युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज यांच्यावर सोपवण्यात आली आहे. न्यूझीलंड संघाचा विचार करता ते विश्वचषकात घेऊन उतरलेल्या संघातील बहुतांश खेळाडू घेऊन उतरले आहेत. कर्णधार म्हणून केनच असून तर ग्लेन हा कमाल फॉर्मात असल्यामुळे त्याच्याकडे सर्वांचे लक्ष असेल.


असे आहेत दोन्ही संघ?


भारतीय संघ -
ईशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुडा, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज.


न्यूझीलंडचा संघ -


फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी. 






सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. 


हे देखील वाचा-


IND vs NZ, Toss Update : भारतानं गमावली नाणेफेक, न्यूझीलंडचा प्रथम गोलंदाजी करण्याच निर्णय